पोहे

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#फोटोग्राफी
#पोहे आणि भजी

पोहे

#फोटोग्राफी
#पोहे आणि भजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 जणांसाठी
  1. 2 कप- जाडे पोहे
  2. 2- मोठे कांदे
  3. 2- मध्यम आकाराचे बटाटे
  4. 2- हिरव्या मिरच्या
  5. 1/4 कप- मटार(ओले वाटाणे)
  6. अर्धे - लिंबू
  7. १०-१२ - कडीपत्त्याची पाने
  8. 1/4कप- ओले खवलेले खोबरे
  9. 2 टेबलस्पून- चिरलेली कोथिंबीर
  10. 3-4 टेबलस्पून- तेल
  11. दीड टीस्पून - राई
  12. दीड टीस्पून - जिरे
  13. 1/4 टीस्पून- हिंग
  14. 1/2 टीस्पून- हळद
  15. 1 टीस्पून- साखर
  16. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पोहे चाळणीत घेऊन पाणी घालून भिजवून घ्यावेत. पोहे निथळत ठेवावेत. कांदे, बटाटे सोलून घ्यावेत. कांदे जाडसर चिरावेत. मिरच्यांचे तुकडे करावेत. बटाट्याच्या लहान फोडी कराव्यात. कोथिंबीर बारीक चिरावी.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात राई-जिऱ्याची फोडणी करावी. त्यात हिंग, मिरच्या व कडीपत्ता घालून वर कांदा घालावा. त्यावर बटाटी व मटार घालून गॅस मंद करून एक वाफ काढावी.

  3. 3

    मटार व बटाटा अर्धकच्चा शिजल्यावर त्यात हळद, थोडे मीठ घालून ढवळावे. बटाटा व मटार पूर्ण शिजल्यावर त्यात साखर व मीठ घालून मिक्स करावे. त्यात भिजवलेले पोहे घालून एकसारखे करून घ्यावे.

  4. 4

    तयार पोह्यांना दणदणीत वाफ येऊ द्यावी. लिंबू पिळून एकसारखे करावे. गरमागरम पोहे वरून ओले खोबरे व कोथिंबीरीने सजवून खायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

Similar Recipes