सोया बिर्याणी (SOYA BIRYANI RECIPE IN MARATHI)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

सध्या रेस्टॉरंट बंद सगळं बंद त्यामुळे घरी सगळं ट्राय करणं सुरू आहे। आज बिर्याणी खायची खूप इच्छा होते होती।चला म्हटलं घरी ट्राय करूया आणि रेस्टॉरंट चं फील घरीच आणूया ।लागली बाई कामाला मी।।।।

सोया बिर्याणी (SOYA BIRYANI RECIPE IN MARATHI)

सध्या रेस्टॉरंट बंद सगळं बंद त्यामुळे घरी सगळं ट्राय करणं सुरू आहे। आज बिर्याणी खायची खूप इच्छा होते होती।चला म्हटलं घरी ट्राय करूया आणि रेस्टॉरंट चं फील घरीच आणूया ।लागली बाई कामाला मी।।।।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपसोया चंक्स
  2. 4कांदे
  3. 4मिरच्या
  4. 8-10लसणाच्या पाकळ्या
  5. 1 इंचआलं
  6. 3 कपतांदूळ
  7. 1/2 कपकोथिंबीर
  8. 2तेजपान
  9. 1मोठी विलायची
  10. 3-4विलायच्या
  11. 4-5लवंगा
  12. 7-8मिरे
  13. 2 टेबलस्पूनतूप
  14. 1टिस्पून तिखट
  15. 1 1/2 टीस्पूनधणेपूड
  16. 1 1/2 टीस्पूनगरम मसाला
  17. 1 टीस्पूनमीठ
  18. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ धुवुन बाजूला ठेवून द्या। एकीकडे गंजात पाणी उकळून त्यात सोया चंक्स 3-4 मिनिट्स बॉईल करून घ्या।चाळणीत काढून थंड पाणी घालून त्याच्यातला पाणीपूर्णपणे सक्वीज करून चंक्स बाजूला ठेवा।

  2. 2

    आता दोन कांद्याचे लांबकाप करून घ्या।मिरच्यांचे पण लांब काप करा।उरलेल्या दोन कांद्याची व मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि लसूण ची पेस्ट करा।

  3. 3

    हंडी मध्ये तूप घेऊन त्यात खडा मसाला, कांदे आणि मिरच्यांचे लांब काप त्यात घाला।

  4. 4

    कांदे ट्रान्सपरंट झाले की त्यात जी पेस्ट आपण बनवली होती त्यात घाला।दोन मिनिटांनी त्यात तिखट धणेपूड आणि गरम मसाला घाला।हे पण दोन मिनिट होऊ द्या।

  5. 5

    आता त्यात सोया चंक्स, तांदूळ आणि मीठ घाला।हे दोन मिनिट तेलावर झालं की त्यात पाणी टाका।वरुन कोथिंबीर घाला आणि झाकण ठेवून हे जवळपास आठ ते दहा मिनिट तांदूळ शिजू द्या।

  6. 6

    दहा मिनिटांनी आपली सोया बिर्याणी रेडी आहे।याला रायत्या बरोबर सर्व्ह करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रोजी

टिप्पण्या

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
मी तुझी ही रेसिपी cooksnap करत आहे

Similar Recipes