टँगी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

रोजच्या जेवणात तोंडी लावणी साठी ही आंबट गोड चटणी भाव खाणारी आहे

टँगी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)

रोजच्या जेवणात तोंडी लावणी साठी ही आंबट गोड चटणी भाव खाणारी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिट
  1. 125 ग्रॅमटोमॅटो
  2. 1मोठा कांदा
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 7लसूण पाकळ्या
  5. 8कढीपत्त्याची पाने
  6. 1 टेबलस्पूनसाखर
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1/2 टी स्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनमेथीदाणे
  10. 1/2 टीस्पूनमोहरी जिरे
  11. 2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

दहा मिनिट
  1. 1

    प्रथम मिरचीचे लांब काप करावे,लसूण बारीक चिरून ठेवावे, कांद्याचे लांब काप करावे व टोमॅटो सुद्धा मिडीयम फोडी करून घ्याव्यात.आता एका भांड्यात तेल घेऊन गरम करायला ठेवावे.नेहमीसारखी जिरे,मोहरी, मेथीदाण्याची फोडणी करावी,त्यानंतर लसुण,मिरच्या, कढीपत्ता व कांदा घालावा.

  2. 2

    कांदा बऱ्यापैकी तांबूस झाल्यावर हळद,मीठ घालून टोमॅटोच्या फोडी घालाव्या.टोमॅटो शिजल्या सारखा झाल्यावर साखर घालून थोड्यावेळ हलवून झाकण ठेवावे व दोन ते तीन मिनिटांनी बंद करावा.

  3. 3

    आंबटगोड टोमॅटो चटणी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या (6)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मी ही रेसिपी cooksnap करत आहे.

Similar Recipes