मॅंगो कुल्फी विथ ग्रिल्ड मॅंगो (mango kulfi with grilled mango recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#मॅंगो
कुल्फी सोबत ग्रिल्ड मॅंगो प्रेझेन्ट केले आहे, त्यामुळे tangy +sweet+hot अशी टेस्ट येते कुल्फी सोबत.

मॅंगो कुल्फी विथ ग्रिल्ड मॅंगो (mango kulfi with grilled mango recipe in marathi)

#मॅंगो
कुल्फी सोबत ग्रिल्ड मॅंगो प्रेझेन्ट केले आहे, त्यामुळे tangy +sweet+hot अशी टेस्ट येते कुल्फी सोबत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

Prep:20min, cooking:7hrs
3 सर्व्हिंग्ज
  1. 2पिकलेले हापूस आंबे
  2. 250 मिली फ्रेश क्रीम
  3. 100 मिली दूध
  4. 50 मिली कंडेन्सड मिल्क
  5. 50 ग्रॅमसाखर
  6. 2-3ड्रॉप्स मॅंगो इसेन्स
  7. ग्रिल्ड मॅंगो साठी :
  8. 1अर्धा आंबा चिरलेला
  9. 1 टीस्पूनमध
  10. 1 टीस्पूनबटर किंवा तूप
  11. 1 पिंचलाल तिखट

कुकिंग सूचना

Prep:20min, cooking:7hrs
  1. 1

    आंबे घ्या, एका बाऊल मध्ये कंडेन्सड मिल्क घ्या,फ्रेश क्रीम, साखर आणि दूध घ्या.फ्रिजर मध्ये आधी 3-4तास कप ठेवा.

  2. 2

    एका बाऊल मध्ये कंडेन्सड मिल्क घेऊन त्यात आंब्याच्या फोडी घाला,छान फेटून घ्या किंवा ब्लेंड करा.आता फ्रेश क्रीम ब्लेंड करा.

  3. 3

    हे दोन्ही मिश्रण एकत्र करा त्यात साखर आणि मॅंगो इसेन्स घाला आणि फेटा

  4. 4

    आता फ्रिजर मधून कप काढा आणि त्यामध्ये कुल्फी चे मिश्रण भरा. त्यांना अलुमिनिम फॉईल ने कव्हर करा आणि फ्रिजर मध्ये 7 तास सेट होण्यास ठेवा.

  5. 5

    ग्रिल्ड मॅंगो साठी चिरलेला आंबा घ्या, त्याला मध लावा. नॉन स्टिक पॅन किंवा ग्रिल्ड पॅन वर बटर किंवा तूप घाला आणि हा मॅंगो ग्रिल्ड करा.

  6. 6

    कुल्फी सर्व्ह करताना या मॅंगो वर लाल तिखट टाका आणि कुल्फी सोबत सर्व्ह करा.कुल्फी वर ड्रायफ्रूट ची पूड टाका.

  7. 7

    तयार आहे मॅंगो कुल्फी विथ ग्रिल्ड मॅंगो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

Similar Recipes