पोटॅटो पोटली विथ ग्रेवी(potato potli with gravy recipes in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#स्टफ्ड
वैदर्भीय कोथिंबीर वडी चा मसाला बटाट्यामध्ये भरून आज एक अफलातून पोटली रस्सा आपल्याला सादर करत आहे

पोटॅटो पोटली विथ ग्रेवी(potato potli with gravy recipes in marathi)

#स्टफ्ड
वैदर्भीय कोथिंबीर वडी चा मसाला बटाट्यामध्ये भरून आज एक अफलातून पोटली रस्सा आपल्याला सादर करत आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
दोन
  1. 5 ते ६मध्यम आकाराचे बटाटे
  2. स्टफिंग साठी साहित्य
  3. 100 ग्रॅमबारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 1 टेबल स्पूनशेंगदाणा कूट
  5. 1 टेबल स्पूनखोबरे किस
  6. 2 टी स्पूनचारोळी
  7. 1 टी स्पूनखसखस
  8. 1 टी स्पूनबडीशेप
  9. 1 टीस्पूनआलेलसूण पेस्ट आपण ग्रेव्हीसाठी सुद्धा यातील वापरणार आहोत
  10. 1 1/2 टीस्पूनमीठ ग्रेव्हीसाठी सुद्धा
  11. 2 टीस्पून तिखट ग्रेव्हीसाठी सुद्धा
  12. 2 टीस्पूनगरम मसाला ग्रेव्हीसाठी सुद्धा
  13. 1लिंबाचा रस
  14. 1/2 टी स्पूनपिठीसाखर
  15. 1 टीस्पूनतेल
  16. आवरणासाठी साहित्य
  17. 1 वाटीकणीक
  18. 1 वाटीबेसन
  19. 1/2 टी स्पूनओवा
  20. 1 पिंचहळद
  21. 2 टीस्पूनतेल मोहनासाठी
  22. ग्रेव्हीसाठी साहित्य
  23. 1कांदा बारीक चिरलेला
  24. 1 टेबलस्पूनतेल
  25. 1 टी स्पूनधणे पावडर

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून स्वच्छ कापडावर कोरडी करून बारीक चिरून घ्यावी.सर्व साहित्य एका ठिकाणी तयार ठेवून,आवरणाचे पीठ म्हणजेच कणिक,बेसन,ओवा,मीठ,हळद व मोहन घालून घट्ट गोळा भिजवून घ्यावा व बाजूला ठेवावे.

  2. 2

    आता बटाटे सोलून मिठाच्या पाण्यात ठेवून नाजुकपणे वरचा थोडा भाग कापून बटाट्याला चाकूने फोटोत दाखवल्याप्रमाणे पोकळ करून बटाट्याला आतून व बाहेरून अगदी थोडेसे मीठ चोळावे व आतील भाग बाजूला काढून ठेवावा,तो आपण ग्रेव्हीत वापरणार आहोत. हे पोकळ केलेले बटाटे तेलामध्ये हलकेसे तळून घ्यावेत.

  3. 3

    वैदर्भीय कोथिंबीर वडी चा मसाला आपण तयार करणार आहोत.त्यासाठी एका भांड्यात अगदी थोडेसे तेल घेऊन गरम करायला ठेवावे.तेल गरम झाल्यावर त्यामध्ये क्रमवार बडीशेप, खसखस,चारोळी,खोबरे कीस,शेंगदाणा कूट,आले-लसूण पेस्ट,तिखट,हळद,गरम मसाला व मीठ इत्यादी घालावे.हे साहित्य परतल्यावर त्यामध्ये लिंबाचा रस व साखर घालून पुन्हा परतावे व गॅस बंद केल्यावर चिरलेली कोथिंबीर घालावी व एकत्र मिश्रण तयार करावे.

  4. 4

    वरील सारण बटाट्या मध्ये दाबून भरावे व कणिक बेसन ऊंडा तयार केलेला आहे, त्याच्या बटाटा पेक्षा थोड्या मोठ्या पुऱ्या लाटून त्या वर स्टफ केलेला बटाटा ठेवून फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे पोटली तयार करून ठेवावी.

  5. 5

    पोटल्या तयार करत असतानाच,दुसरीकडे गॅसवर भांडे ठेवून त्यामध्ये तेल गरम करावे. गरम तेलामध्ये चिरलेला कांदा व उरलेल्या बटाट्याचे बारीक काप घालून,आले लसून पेस्ट,मीठ,तिखट, धणेपूड व गरम मसाला घालून हे संपूर्ण साहित्य तेलावर खमंग झाल्यावर आवश्यक इतके पाणी घालावे.

  6. 6

    या रस्याला चांगल्या उकळया येऊ द्याव्यात, बऱ्यापैकी बटाटा शिजलेला वाटेल त्यावेळी रस्यामध्ये हळुवारपणे पोटल्या घालाव्यात व झाकण ठेवून शिजू द्याव्या. झाकण काढून एकदा पोटल्या थोड्या फिरवून घ्याव्यात,म्हणजे सगळीकडून वाफेवर एक सारख्या शिजतील. पुन्हा एकदा थोड्यावेळासाठी झाकण ठेवावे पोटली चा रंग बदलेल तेव्हा समजावे की आतलं पोटॅटो स्टफिंग शिजलं आहे.आता गॅस बंद करावा पोटॅटो पोटली तयार आहे. मुख्य फोटो मध्ये एक पोटली कापून दर्शविलेली आहे.

  7. 7

    पोटॅटो पोटली सोबत वरील छायाचित्रांमध्ये विदर्भाची प्रसिद्ध कोथिंबीर वडी सुद्धा दर्शवली आहे ही कोथिंबीर वडी वरील साहित्यातून च तयार केलेली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या (13)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
मीही कडधान्ये पोटली केली होती.
२. पोटलीचे
बक्षिसं हि मिळवली. मी खाली pic share करते हैं

Similar Recipes