गिले वडे (gile wade recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक
काॅलेजमध्ये असतांना सकाळच्या वेळी घाईतच निघणे होत असे त्यामुळे पहिला तास झाला की मधल्या वेळेत लगेच मैञिणींसोबत अंबापेठेतील कोपऱ्यावरच्या त्या घर वजा चाट सेंटर वर जावून मस्त एक प्लेट गिलावडा खाल्ला की मन व पोट दोन्ही भरत असे, मग दुपार पर्यंत भूक ही लागत नव्हती.असा हा अगदी पौष्टीक, चविष्ट गिलावडा म्हणजे अमरावतीच्या खाद्य विश्वाचा राजा.
अमरावतीत राहणारा व येथे येणाऱ्यांनी गिलावडा खाल्ला नाही असे उदाहरण फारच क्वचित.सध्या केंव्हाही व सगळीकडे उपलब्ध असलेला हा गिलावडा पुर्वी फक्त सकाळीच आणि ठराविक ठिकाणीच मिळत असे त्यामुळे शहरातील मोजक्याच ठिकाणी सर्वच स्तरातील खाण्याचे चाहते हा गिलावडा खायला गर्दी करत असत.
जर्मनच्या मोठ्या भांड्यातील पाण्यात सकाळी सकाळी पोहण्याचा सराव करीत असलेले हे गिलेवडे ज्यावेळी ग्राहक मागत त्यावेळी तो गिलेवडेवाला त्याभांड्यातील दोन गिलेवडे काढून त्यातील हलकेच पाणी पिळून काढी व पळसाच्या द्रोणमध्ये त्या दोन गिलेवड्यांवर चमच्याने चिंचेची चटणी, लाल चटणी व हिरवी चटणी अशा पध्दतीने टाकत असे की तिथे उभ्या असलेल्या गिऱ्हाईकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नसे, या सर्वाच्या सोबतीला थोडे दही,बारीक शेवेचा श्रृंगार व बाजूला थोडी लाल तिखट चटणी या सर्व थाटात हा गिलावडा ग्राहकाच्या हाती येई, बनवतांनाच भूक चाळवलेली असल्याने दोन प्लेट शिवाय खाणाऱ्याचे तर पोटच भरत नसे.
तर मग आता वाट कसली बघताय चला अमरावतीचा हा सुप्रसिध्द गिलावडा खायला व त्याची रेसेपी शिकायला सज्ज व्हा.
.......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. वड्या साठी
  2. 250 ग्रॅमउडीद डाळ
  3. 1/4 टीस्पूनहिंग
  4. 1/2 टीस्पूनमीठ
  5. लाल चटनी साठी
  6. 25 ग्रॅमलाल मिर्ची
  7. 10-12लसुण पाकळ्या
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 1 टीस्पूनमीठ
  10. 1 टीस्पूनधणे पूड
  11. 1 टीस्पूनतेल
  12. हिर्वी चटनी साठी
  13. 1/2 वाटीकोथिंबिर
  14. 5-7हिरव्या मिरच्या
  15. 5-6लसुण पाकळ्या
  16. 1 टीस्पूनजीरे
  17. 1/2निंबाच रस
  18. 1 टीस्पूनमीठ
  19. 1/4 टीस्पूनकाळे मीठ
  20. सजावटी साठी
  21. 1 टेबलस्पूनदही
  22. 1 टेबलस्पूनशेव
  23. 250 ग्रॅमतळण्यासाठी तेल
  24. 2 टेबलस्पूनचिंचेची चटणी

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम उडीद डाळ रात्र भर भिजत घालुन सकाळी मिक्सर मधे जाडसर दळुन घ्या हिंग व मिठ घालुन एकजीव करा व किमान अर्धा तास तरी बाजुला ठेवा. तो पर्यंत गैस वर तळणापुरते तेल गरम करा व एकिकडे वडे चांगले बुडतील इतके पाणी गरम करा व त्यात थोडे मीठ घाला

  2. 2

    आत्ता हिरवी चटणी चे साहित्य मिक्सर च्या भांड्यात घेउन पाणी घालून बारिक फिरवून घ्या. लाल चटनी लाल मिरच्या एक तास भिजत ठेवा मग निथळून घ्या व किंचीत तेलात सगळे साहित्य घालुन हलकेच परता व थंड झाले की मिक्सर मधून थोडे पाणी घालुन बारिक करुन घ्या

  3. 3

    आत्ता डाळी चे सारण घ्या हाताला थोडे पाणी लावा, डाळीचा पोळी करतो तेव्हड गोळा घ्या व स्वच्छ प्लास्टिक वर थापून घ्या व लाल होइए पर्यंत स्लो गैस वर तळून घ्या, सर्व तळून झाले की मिठ घातलेल्या गरम पाण्यात तिस मिनिट छान भिजुद्या किंवा लिहिल्या सारखे छान पोहू द्या

  4. 4

    तिस मिनिटांनी (किंवा जास्त पण झाली तरी चाललेल) सर्व्हींग करतांना पाण्यात भिजलेला वडा हलकेच हातानी दाबाय्चा (एकदम कोरडा नाही करायचा) व सर्वींग प्लेट मधे ठेवा आत्ता दोन्ही चटण्या थोडे थोडे पाणी घालुन घट्टसर पातळ करा. प्लेट मधे वड्या वर मिठ घालुन फेटलेले दही घाला (दही जास्त नक्को), मग त्यावर लाल चटनी घाला नंतर त्यावर हिरवी चटणी घाला,मग चिंचेची चटनी घाला व थोडी शेव घालुन गिलेवडे सर्व्ह करावे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या (3)

Similar Recipes