चवळी वडे (chawali wade recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#रेसिपीबुक #week5
#पावसाळीगम्मत
मस्त बाहेर पाऊस पडत आहे तेव्हा गरमागरम चटपटीत कोणी काहीतरी बनवून दिलं तर लगेच फस्त करतील सर्वजण. आता वडे म्हटले की डाळवडे, मेदूवडे, बटाटेवडे, कोंबडीवडे असे काही वडे डोळ्यासमोर येतात, पण तुम्ही कधी चवळीचे वडे बनविलेत का??? मग नक्कीच बनवून बघा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जण
  1. २०० ग्राम चवळी
  2. 1कांदा चिरलेला
  3. 2-3हिरवी मिरची
  4. १" आले
  5. 7-8कढीपत्त्याची पाने
  6. 1/2टिस्पून हळद
  7. 1टिस्पून तिखट
  8. 1टिस्पून जिरे
  9. हिंग
  10. चवीनुसारमीठ
  11. तेल तळण्यासाठी
  12. टोमॅटो सॉस
  13. हिरवी चटणी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    चवळी ५ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर धुवून पाणी निथळून मिक्सरमध्ये पेस्ट करा. कांदा, हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता बारीक चिरून घ्या.

  2. 2

    एका भांडयात वाटलेली पेस्ट व चिरलेले कांदा, हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता, हळद, तिखट, हिंग, मीठ घालून एकजीव करा.

  3. 3

    लोखंडी तव्यात तेल घालून तापवा आता हाताला पाणी लावून वरील मिश्रणाचे छोटे चपटे वडे बनवा व तेलात मंद गॅसवर खरपूस तळून घ्या. हिरवी चटणी व टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या (7)

Similar Recipes