स्टीम सुजी रोल (steam sooji role recipe in marathi)

Manjiri Bhadang
Manjiri Bhadang @cook_21998944

आज रव्या पासून काही नवीन बनवायची इच्छा झाली म्हणून ही रेसीपी करुन पाहीली. खाल्या नंतर कळत की मोमोझ चे मराठी आणि पौष्टीक वर्ज़न आहे करून बघा. 😊

स्टीम सुजी रोल (steam sooji role recipe in marathi)

आज रव्या पासून काही नवीन बनवायची इच्छा झाली म्हणून ही रेसीपी करुन पाहीली. खाल्या नंतर कळत की मोमोझ चे मराठी आणि पौष्टीक वर्ज़न आहे करून बघा. 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपरवा
  2. 1/2 कपदही
  3. 1/2टिस्पून मीठ
  4. 1/8टिस्पून बेकिंग सोडा
  5. टोमॅटो सॉस
  6. स्टफिंग साठी
  7. 1/2 कपबारीक चिरलेली शिमला मिरची
  8. 1/2 कपबारीक चिरलेली फुलकोबी
  9. 1/4 कपबारीक चिरलेल गाजर
  10. 1/2 कपकॉर्न
  11. आवडीनुसारचिज
  12. 1/2 टिस्पून मीठ
  13. 2-3 टेबलस्पूनकोथिंबीर
  14. फोडणी साठी
  15. 2 टिस्पून तेल
  16. 10-12कढीपत्ता
  17. 1/4 टिस्पून मोहरी
  18. 1/2 टिस्पून तीळ
  19. 1/4 टिस्पून हिंग
  20. 2-3हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात रवा घ्या, त्यात दही, 1/2 टिस्पून मीठ आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करून गोळा तयार करा. 10 मिनिटे झाकून ठेवावे.

  2. 2

    स्टफिंग साठी:बारीक चिरलेली शिमला मिरची,फुलकोबी, गाजर आणि कॉर्न. कढईत 1 चमचा तेल घालावे, गरम करुन त्यात चिरलेली भाजी घालून मिठ, तिखट, चाट मसाला, चिज 1/2 टिस्पून मीठ, कोथिंबीर टाकून मिक्स करावे.

  3. 3

    रव्याचा गोळा मळून पोळी लाटून त्यावर टोमॅटो सॉस लावावा आणि स्टफिंग पसरवून रोल करावी. नंतर एका कढईत पाणी घालून गरम करून त्यात रिंग ठेवावी तयार रोल एका ताटात ठेवावे त्त्याला कढईत ठेवुन 15 मिनट वाफवावे.

  4. 4

    फोडणी साठी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, तिळ, कढीपत्ता, हिंग, बारीक चिरलेली मिरची घालावी. रोल वाफवून थंड झाले की कापून त्यावर फोडणी ओतावी. जर थोडे कुरकुरीत आवडत असतील तर शालो फ्राय पण करु शकता.

  5. 5

    स्टीम सुजी रोल तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manjiri Bhadang
Manjiri Bhadang @cook_21998944
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes