सुजी व्हेजी ट्रायँगल्स (suji veg triangles recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#ngnr
week 4
कूकपॅडवरील "नो ओनियन नो गार्लिक" या थीम साठी 'सुजी वेजि ट्रायँगल्स' ही रेसिपी बनविली आहे. अतिशय सोपी,पौष्टिक व टेस्टी रेसिपी आहे. ब्रेकफास्टसाठीही उत्तम अशी रेसिपी आहे. मला आवडली. बघा! तुम्हालाही आवडते का? नक्कीच करून बघा.. 🥰

सुजी व्हेजी ट्रायँगल्स (suji veg triangles recipe in marathi)

#ngnr
week 4
कूकपॅडवरील "नो ओनियन नो गार्लिक" या थीम साठी 'सुजी वेजि ट्रायँगल्स' ही रेसिपी बनविली आहे. अतिशय सोपी,पौष्टिक व टेस्टी रेसिपी आहे. ब्रेकफास्टसाठीही उत्तम अशी रेसिपी आहे. मला आवडली. बघा! तुम्हालाही आवडते का? नक्कीच करून बघा.. 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 minite
4 लोकांकरिता
  1. 1 वाटीरवा (सुजी)
  2. 1 वाटीदही
  3. 2बटाटे
  4. 1सिमला मिरची
  5. 1 वाटीपेस्ट होईल इतकी पालकची पाने
  6. 1गाजर
  7. 5-6मिरच्या
  8. 1/2 इंचआले
  9. 1 टीस्पून बेकिंग पावडर
  10. 1/4 टीस्पून खायचा सोडा
  11. 1 टीस्पून गरम मसाला
  12. चवीनुसारमीठ
  13. आवश्यकतेनुसार तेल

कुकिंग सूचना

30 minite
  1. 1

    सर्वात प्रथम रवा दह्यात भिजत घालून ठेवावा. बटाटे व गाजरचे साल काढून खिसून घ्यावेत. सिमला मिरची चिरून घ्यावी. पालकची पाने धुऊन घ्यावीत.

  2. 2

    पॅनमध्ये मिरची,आले, चिमूटभर मीठ घालून परतावीत व एक वाफ आणावी. त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरला खिसलेल्या बटाट्यासहित पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    दहिमिश्रित भिजलेल्या रव्यामध्ये तयार पेस्ट मिक्स करावी. बेकिंग सोडा, खायचा सोडा, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालावे. तयार मिश्रण कुकरच्या डब्याला तेल लावून त्यात ओतावे व खिसलेले गाजर व चिरलेली सिमला मिरचीचे तुकडे वरून घालावेत.

  4. 4

    तयार मिश्रण कुकरमध्ये वाफवून घ्यावे. दहा-बारा मिनिटांनी चेक करावे, सुरीला मिश्रण चिकटले नाही म्हणजे मिश्रण शिजले असे समजावे.

  5. 5

    शिजलेले मिश्रण थंड झाले की, ते ट्रायँगल्स शेपमध्ये कट करून तव्यावर शॅलो फ्राय करावेत. गरमागरम 'सुजी वेजि ट्रायँगल्स' सॉस बरोबर सर्व्ह करावेत.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

Similar Recipes