खुर (मटण पाया) (mutton paya recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळे नाव आहेत हैदराबादला मटन पाया असं ओळखले जाते आपल्या नागपूरला खूर असे संबोधले जाते ही भाजी खायला अत्यंत चविष्ट लागते या भाजी मध्ये खूप ताकत असते असं म्हणतात प्रोटीन्स भरपूर असते आणि माझ्या नवऱ्याला ही भाजी खूप आवडते आणि मला बनवायला पण खूप आवडतात अशा मसाल्याच्या भाज्या

खुर (मटण पाया) (mutton paya recipe in marathi)

प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळे नाव आहेत हैदराबादला मटन पाया असं ओळखले जाते आपल्या नागपूरला खूर असे संबोधले जाते ही भाजी खायला अत्यंत चविष्ट लागते या भाजी मध्ये खूप ताकत असते असं म्हणतात प्रोटीन्स भरपूर असते आणि माझ्या नवऱ्याला ही भाजी खूप आवडते आणि मला बनवायला पण खूप आवडतात अशा मसाल्याच्या भाज्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

6 सर्व्हिंग्ज
  1. दीड किलो खुर (मटणाचे)
  2. 1कांदा
  3. 3 टेबल स्पूनतेल
  4. ग्रेव्ही मसाला साठी साहित्य
  5. 2मोठी विलायची
  6. 4तेज पान
  7. 1 टेबल स्पूनधने
  8. 1 इंचकलमी तुकडा
  9. दहा-बारा मिरे
  10. 67 तुकडेखोबरे
  11. 2छोटी विलायची
  12. 3कांदे
  13. 2 टेबल स्पूनआलं लसून पेस्ट
  14. कोथिंबीर
  15. मीठ चवीनुसार
  16. 2 टेबस्पून तिखट
  17. 1 टेबल स्पूनएव्हरेस्ट मटन मसाला
  18. 1 टेबल स्पूनदही

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम खूर चांगले धुवून घ्या आता एका गंजात किंवा कुकरमध्ये तीन टेबलस्पून तेल टाका व तेल गरम झाले की त्यात एक कांदा बारीक चिरलेला टाका कांदा थोडा झाला की त्यात हळद टाका व त्यात खूर चे तुकडे व मीठ टाकून मिक्स करा त्यात थोडे पाणी टाकून कुकर मध्ये दहा-बारा शिट्या होऊ द्या व नंतर छोट्या फ्लेमवर 30मिनीट कुकर ठेवा कारण खूर शिजायला खूप वेळ लागते

  2. 2

    आता एका कढईत बिलकुल थोडेसे तेल टाकून मसाला भाजून घ्या आणि मग त्याच कढईत कांदे भाजून घ्या कांदे गोल्डन होत पर्यंत भाजा व नंतर दोन्ही थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या

  3. 3

    आता एका कढईत चार टेबलस्पून तेल टाका व तेल गरम झाले की त्यात एक कांदा बारीक कापलेला टाका कांदा ब्राऊन झाला की त्यात आपण केलेली पेस्ट टाका व मिक्स करून मसाला चांगला भाजून घ्या आता मसाला छान भाजला तेल वर आले की त्यात आलं-लसूण पेस्ट टाका व दोन-तीन मिनिटं चांगले होऊ द्या

  4. 4

    मसाला चांगला भाजला तेल सुटले की त्यात तिखट व एव्हरेस्ट मसाला टाका व चांगले मिक्स करा तेल सुटेपर्यंत

  5. 5

    आता छान तेल सुटले की त्यात शिजलेले खुर् टाका व जर खाली लागत असेल तर थोडीशी पाणी टाका व दहा पंधरा मिनिटे झाकून ठेवा मध्ये मध्ये चेक करत रहा

  6. 6

    आता झाकण उघडून त्यात खुर् चे उरलेले पाणी टाका किंवा आपल्याला जशी ग्रेव्ही पातळ पाहिजे तेवढे पाणी टाका व एक टेबल स्पून दही टाकून मिक्स करा व बारा-पंधरा मिनिटे झाकून ठेवा

  7. 7

    आता झाकण उघडा भाजी हलवा वरून कोथिंबीर टाका व गॅस बंद करा

  8. 8

    आता आपली खुर ची भाजी तयार आहे कुठे कुठे याला मटन पाया पण म्हणतात आता ही भाजी तुम्ही गरम गरम भाकरी पोळी फुलके कशाही सोबत खाऊ शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes