पारंपारिक अळू चे फदफदं/अळूचे गरगटे (alooche fadfade / gargate recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#रेसिपीबुक #week5
पावसाळी गंम्मत रेसिपी 1
पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या भरभरून येतात. माझ्या घरा समोरच्या बागेतच आलेल्या अळूच्या पाने वापरून मी ही पारंपरिक रेसिपी बनवलीय, यात फक्त नि ओवा ची पाने थोडा वेगळा twist म्हणुन वापरली आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 4-5अळू ची पाने
  2. 4-5ओव्याची पाने
  3. 1/2 वाटीशेंगदाणे
  4. 1 टेबलस्पूनडाळीचे पीठ
  5. 1 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कूट
  6. 1 इंचचिंच
  7. 1 टीस्पूनगूळ
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 4-5लसूण पाकळ्या
  11. जीरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  12. तेल आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    अळू ची पाने, ओव्याची पाने धुवून, चिरून घेणे.

  2. 2

    चिरलेली अळू, ओव्या ची पाने एकत्र करून कूकर ला शिजवून घेणे, शेंगदाणे ही उकडून घेणं.

  3. 3

    शिजलेकी रवी ने हाटुन घ्यायचे, त्यात डाळीचे पीठ टाकून पुन्हा छान हटायचे. एका पण मध्ये तेल घायचे, त्यात जीरे, मोहरी, हिंग घालून हटले मिश्रण टाकायचे.त्यात आता मीठ, हळद, तिखट गूळ, शेंगदाणे कूट, शेंगदाणे घालून 5 मिनिट झाकून ठेवायचे.

  4. 4

    अळूचे गरगटे तयार आहे, गरम गरम भाता सोबत, पोळी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (5)

Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

Top Search in

Similar Recipes