दिंडे (Dinde Recipe in Marathi)

भारतीय संस्कृति आपल्याला 'मानव' तसेच 'निसर्ग' याबद्दल प्रेम व आत्मियता हे भाव शिकवते. आपल्या संस्कृतीत अनेक सण, व्रत-वैकल्ये ही, पशु-पक्षी, वृक्ष-वनस्पती यांचा आदर व त्यांच्या सोबत आत्मियता जोडण्यासाठी केली जातात.... जसे की, गो-पूजन, वसुबारस, कोकीळा व्रत, पोळा, वटसावित्री, नागपंचमी इत्यादि....
आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि *नाग/साप* हा शेताचे रक्षण करतो म्हणून त्याला *क्षेत्रपाळ* या नावानेही संबोधले जाते.... पिकांचे नुकसान करणारे जीवजंतु, किटक, उंदिर अशा प्राण्यांचा नाश करुन, पिकांना हिरवेगार ठेवण्याचे काम हा सर्प *क्षेत्रपाळ* बनून वर्षानुवर्षे मानवावर अनेक उपकार करतो... तसेच बिळात राहणारा हा सर्प, पावसाळ्यात मात्र निर्वासित बनून मानव वस्तीत आसरा शोधत असतो, त्यावेळी त्याने केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून कृतज्ञ बुध्दिने *नाग-पूजन* करण्याची प्रथा वैदिक काळापासून सुरु आहे आणि त्यामुळेच *नागपंचमी* चा उत्सव हा श्रावण महिन्यात आयोजित केला जातो.
*नागपंचमी* ला बहुतांशी महाराष्ट्रीयन कुटुंबात आणि प्रामुख्याने शेतकरी समुदायात, *नाग पूजन* याला खास महत्व...
यादिवशी, *शेतात नांगर फिरवणे*, कोणत्याही प्रकारे *कापणे, चिरणे, ठेचणे आणि तव्यावर काही भाजणे* या क्रिया केल्या जात नाहीत.... शहरांत, गारुडी टोपल्यांमधे साप घेऊन "सर्पदर्शना"साठी दारोदारी फिरतात व अनेक भाविक, या नाग देवतेला दुध-लाह्यांचा प्रसाद अर्पण करतात... तसेच अनेक घरांघरात - मातीचे "नाग कुटुंब" बनवून किंवा पाटावर चंदनाने ५ नाग रेखाटून *नाग पूजा* केली जाते आणि जो नैवेद्य अर्पण करतात त्यात "वरण-भात, बटाटा भाजी" व *दिंडे* या पारंपरिक पदार्थाचे स्थान उच्चतम आहे.
दिंडे (Dinde Recipe in Marathi)
भारतीय संस्कृति आपल्याला 'मानव' तसेच 'निसर्ग' याबद्दल प्रेम व आत्मियता हे भाव शिकवते. आपल्या संस्कृतीत अनेक सण, व्रत-वैकल्ये ही, पशु-पक्षी, वृक्ष-वनस्पती यांचा आदर व त्यांच्या सोबत आत्मियता जोडण्यासाठी केली जातात.... जसे की, गो-पूजन, वसुबारस, कोकीळा व्रत, पोळा, वटसावित्री, नागपंचमी इत्यादि....
आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि *नाग/साप* हा शेताचे रक्षण करतो म्हणून त्याला *क्षेत्रपाळ* या नावानेही संबोधले जाते.... पिकांचे नुकसान करणारे जीवजंतु, किटक, उंदिर अशा प्राण्यांचा नाश करुन, पिकांना हिरवेगार ठेवण्याचे काम हा सर्प *क्षेत्रपाळ* बनून वर्षानुवर्षे मानवावर अनेक उपकार करतो... तसेच बिळात राहणारा हा सर्प, पावसाळ्यात मात्र निर्वासित बनून मानव वस्तीत आसरा शोधत असतो, त्यावेळी त्याने केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून कृतज्ञ बुध्दिने *नाग-पूजन* करण्याची प्रथा वैदिक काळापासून सुरु आहे आणि त्यामुळेच *नागपंचमी* चा उत्सव हा श्रावण महिन्यात आयोजित केला जातो.
*नागपंचमी* ला बहुतांशी महाराष्ट्रीयन कुटुंबात आणि प्रामुख्याने शेतकरी समुदायात, *नाग पूजन* याला खास महत्व...
यादिवशी, *शेतात नांगर फिरवणे*, कोणत्याही प्रकारे *कापणे, चिरणे, ठेचणे आणि तव्यावर काही भाजणे* या क्रिया केल्या जात नाहीत.... शहरांत, गारुडी टोपल्यांमधे साप घेऊन "सर्पदर्शना"साठी दारोदारी फिरतात व अनेक भाविक, या नाग देवतेला दुध-लाह्यांचा प्रसाद अर्पण करतात... तसेच अनेक घरांघरात - मातीचे "नाग कुटुंब" बनवून किंवा पाटावर चंदनाने ५ नाग रेखाटून *नाग पूजा* केली जाते आणि जो नैवेद्य अर्पण करतात त्यात "वरण-भात, बटाटा भाजी" व *दिंडे* या पारंपरिक पदार्थाचे स्थान उच्चतम आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाच्या पीठाचे, मीठ व तेल घालून कणिक मळून साधारणतः १० मिनीटे झाकून ठेवावे. (कणिकमधे फुड कलर टाकून रंगीत दिंडे बनवता येतात)
- 2
पुरणासाठी चणा डाळ स्वच्छ धुवून ५-६ तास भिजत ठेवावी. मग कुकरमधे ३-४ शिट्ट्या करुन चणा डाळ वाफवून, कुकर सुटला कि, जाळीवर निथळत ठेवावी.
- 3
पुरण तयार करताना, एका जाड बुडाच्या कढईत - वाफवलेली चणा डाळ चुरावी मग त्यात गुळ व १ चमचा साखर घालून मंद आचेवर पुरण शिजवावे. (पुरण खुप कोरडे व कडक करु नये आणि पुरण थोडे थंड झाल्यावर त्यात इसेन्स मिक्स करावा)
- 4
आता दिंडे भरण्यासाठी, कणकेचा लिंबाऐवढा गोळा घेऊन पुरीपेक्षा थोडी मोठी पोळी लाटावी, त्यावर पुरण ठेऊन प्रथम उजवी व डावी कडा दुमडावी मग खालची बाजू व नंतर वरची बाजू दुमडून, आयताकार दिंडे भरुन तयार करावे. (चित्रात दाखवल्याप्रमाणे)
- 5
मग स्टीमर किंवा इडली पात्र किंवा मोदक पात्र यामधील जाळीला तेल लावून त्यावर भरलेले दिंडे ठेऊन साधारणतः २० मिनीटे वाफवून घ्यावे.
- 6
गरम गरम दिंडे वर साजूक तुप घालून सर्व्ह करावे.
Similar Recipes
-
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen#recipe2 #cooksnap Supriya Vartak Mohite ह्याची दिंडे ही रेसिपी रिक्रिएट केली. ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली Supriya Vartak Mohite ह्यांच्यामुळे दिंडे ही रेसिपी माहित झाली. धन्यवाद Supriya मॅडम. Amrapali Yerekar -
दिंडे रेसिपी (dinde recipe in marathi)
#Shravanqueen #दिंडे #supriyamothite आमच्या इथे या पदार्थाला कानोले असे म्हणतात. आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी हे कानोले बनवले जातात. आणि या सोबत शेपूची भाजी पण बनवली जाते. हे निवेद्य नागपंचमीच्या दिवशी नागोबाला निवेद्य दाखवले जातात. Sapna Telkar -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueenसुप्रिया ताई यांच्यामुळे आज हे पुरणाचे दिंड मी पहिल्यांदा बनवून पाहिले... धन्यवाद सुप्रिया ताई🙏 Aparna Nilesh -
दींडे (dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#cooksnap#SupriyaVartakMohiteRecipeआज मी सुप्रिया वर्तक मोहिते मॅडम ची रेसिपी खूप स्नॅप केलेली आहे कूपेड मुळे आम्हाला नवीन नवीन रेसिपी शिकायला मिळत आहेत आणि आज ची रेसिपी दिंडे मी प्रथमच ऐकत आहे आणि मलाही रेसिपी सोपी आणि सात्विक वाटली आणि खायला पण खूपच टेस्टी आहे म्हणून मी ही रेसिपी रेसिपी बुक साठी पण केलेली आहे Maya Bawane Damai -
दिंडे (पुरणाचे) (purnache dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक मध्ये १४वी रेसिपी आहे,#shravanqueen#post2#cooksnap#Supriya Vartak Mohite ताईंनी खूप छान अशी पारंपारिक रेसिपी शिकवली आहे. आमच्याकडे हा पदार्थ नविनत आहे, पण मी दिंडे हा एक पदार्थ आहे म्हणून माहिती होते पण कधी बघीतले ही नाहीआणि आणि खाल्ले ही नाही, माझी पहिली च वेळ पुरणाचे दिंडे बनवण्याची, मी माझ्या मैञिनीला विचारले तर त्याच्या कडे हा पदार्थ दिंडे नागपंचमीच्या दिवशी बनवतात म्हणून सांगितले आणि स्टिम न करता तळून घेतात. मी दोन्ही पद्धतीचे बनवले आहेत. जेणेकरून तुम्हालाही समजेलचला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻😁 Jyotshna Vishal Khadatkar -
कदलीफलम् उंबर (Kadalifalam Umbar Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week8 #नारळीपौर्णिमारेसिपीज् #पोस्ट१नारळीपौर्णिमा....म्हणजेच *श्रावणी पौर्णिमा*....तीन उत्सवांचा "त्रिवेणीसंगम"... *उपनयन संस्कार उत्सव, रक्षाबंधन उत्सव आणि समुद्र पूजन उत्सव*यादिवशी, बहुतांशी ब्राह्मण समाजात *यज्ञोपवीत* बदलले जाते,.. समस्त स्त्री वर्गाकडे आदराने पाहाण्याचा दृष्टिकोन, संरक्षण आणि भाऊ-बहिणीच्या विशुद्ध प्रेमाचा संदेश देणारा उत्सव म्हणजे *रक्षाबंधन* साजरे होते... तसेच जल मार्गाने व्यापार करुन आपला उदरनिर्वाह करणारे व्यापारी बांधव... *सागरे सर्व तीर्थानि* या श्रध्देने, *सागर पूजन* करताना वरुण देवतेला श्रीफळ अर्पण करुन पुन्हा नव्या जोमाने व्यापार सुरु करतात.नारळीपौर्णिमा.... मनुष्याला विचार, गुण, जीवन व अंतर्गत सौंदर्य आत्मसात करण्याची प्ररेणा देते.... आणि म्हणूनच अशा जीवन सौंदर्याचे प्रतिक असलेले *श्रीफळ*(नारळ... बाहेरुन कठोर पण आतून मऊ) समुद्राला अर्पण होते... बलिदान म्हणून मंदिरात फोडले जाते.... शुभकार्यात वापरले जाते....आणि नैवेद्य-प्रसाद म्हणून विविध पाककृतींमधे सामावले जाते...अनन्य साधारण महत्व असलेल्या या *श्रीफळाला* (नारळाला) आज मी... एका पारंपरिक रेसिपीत समरस करुन, लुप्तावस्थेच्या मार्गावर असणाऱ्या या रेसिपीला नव्या पध्दतीने सादर केले आहे... 🥰👍🏽😊(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
दिंडे (dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #shravanqueen सात्विक पारंपारिक पदार्थ शिकायला मिळाला , नवीन पुरणाचा पदार्थ बनवला. नागपंंचमीला भाजणे,तळणे वर्ज्य असते ,हा उकडलेला पदार्थ नैवेद्य म्हणुन बनवतात Kirti Killedar -
दिंडे (Dinde recipe in marathi)
#shravanqueen रेसिपी-2 मोहिते मॅडम नी सांगितल्याप्रमाणे नागपंचमी सणालाच हा पदार्थ केला जातो.आमच्याकडे फारसाकोणालाही आवडत नाही. आज कूकपॅडमुळे करून बघितला. लहानपणी भरपूर खाल्लेले. Sujata Gengaje -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#सुप्रियावर्तकमोहिते Ashwini Vaibhav Raut -
दिंडे.. (dinde recipe in marathi)
#Shravanqueen #post2#cooksnap#SupriyaVartakMohiteदिंडे ह्या रेसिपी बद्दल मी बरंच ऐकलं होतं. पण कधी करून बघितली नाही. पण आज तो योग आला सुप्रिया ताई मुळे, श्रावण क्वीन यामध्ये सुप्रियाताईंनी पारंपारिक दिंडे कसे करायचे खूप छान प्रकारे सांगितले.तसेही मी जेव्हा पुरण करते त्यात मी साखरेचा वापर करूनच पूरण तयार करत असते. पण आज पहिल्यांदाच गुळाचा वापर करून मी पुरण तयार केले आहे. आणि गूळ देखील ऑरगॅनिक. या गुळाची चव खुप छान लागते. एवढं मात्र आहे की पुरणाचा कलर थोडासा काळपड येतो. कारण मुळातच हा गुळ काळपट रंगाचा असतो. पण चव एकदम मस्त. म्हणून मी यात पिवळा गुळ न वापरता हा गुळ वापरला आहे... 💕💃 Vasudha Gudhe -
पूरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक श्रावण महिना म्हटलं की या महिन्यामध्ये लसण,कांदा खात नसतात. श्रावण महिनाच नव्हे तर श्रावण ,भाद्रपद ,आश्विन, कार्तिक अशा चातुर्मासात कांदा,लसण बहुतांश जण खात नाहीत. मग सात्विक म्हणजे काय ? तर कांदा-लसूण विरहीत पदार्थ हा म्हणजे सात्विक. तसे तर आषाढ महिना लागल्यापासूनच सणांची रेलचेल सुरू होते. आणि आपल्या घरी नवनवीन गोड पदार्थ बनत असतात. आज मी पुरणाचे दिंडे केलेले. तसे सांगायचे म्हणजे हा पदार्थ माझ्यासाठी नवीनच. दिंडे हे वाफवून तुपा सोबत खातात. आणि तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळून सुद्धा करतात मी आज दोन्ही प्रकारचे दिंडे केलेले आहेत. तर चला मैत्रिणींनो बघुयात दिंडे कसे केले ते....😊 Shweta Amle -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी सुप्रिया मोहिते ताई यांची दिंडे ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.माझ्यासाठी ही रेसिपी नवीनच आणि नाव सुद्धा पहिल्यांदाच ऐकलेलं. पहिल्यांदाच केली पण खरच खूप छान झाली आणि घरी सुद्धा सगळ्यांनाच आवडली. चला तर मग बघुया दिंडे कसे करतात तर😊 Shweta Amle -
-
पुरणाचे दिंडे आणि मोदक (purnache dinde ani modak recipe in marathi)
#triआज नागपंचमीचा सण आहे या दिवशी चाकुने काही कापत नाहीत गॅसवर तवा ठेवत नाही. पुरणाची दिंडे नेवैद्य बनवला जातो. महाराष्ट्रामध्ये बत्तीस शिराळा म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी जिवंत नाग पकडून यांची पूजा केली जाते. प्रथम अंबाबाईच्या देवळामध्ये नागाला खेळवतात त्याची पूजा करतात आणि मग घरोघरी नागदेवता पुजली जाते. Smita Kiran Patil -
पुरणपोळी - गौरी चा नैवेद्य (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#सात्विक नैवेद्य - पुरणपोळी#पोस्ट 2 पुरणपोळी ....स्वयंपाक क्षेत्रामधील माझा आवडता प्रकार. गोड न खाणारी मी ...पुरणपोळी पुढे शरणागती पत्करते. हा स्वयंपाक मी खुप enjoy करते. पुरणाचे & कणकेचे गणित जमले ना की..मग मैदान आपलेच..निम्मी लढाई इथेच जिंकली जाते. सरसर लाटली जाणारी, टम्म फुगणारी, नर्म, खुसखुशीत पोळी खायला लाजवाब..🥰🥰 प्रत्येक गृहिणी ची पद्धतीत थोडा फार फरक असतो. मी माझ्या पद्धतीने गौराईचा पुरणपोळी नैवेद्य केला आहे.. Shubhangee Kumbhar -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap #दिंडेमी पहिल्यांदा हा पदार्थ केला. छान झाला. Pranjal Kotkar -
दिंडे(पुरणाचे) (dinde recipe in marathi)
#shravanqueenसुप्रिया मोहिते यांनी शिकवलेली आजची रेसिपी तयार आहे फक्त काही बदल केले आहेत जसे की वेलची,जायफळ आणि सुंठ पावडर वापरून ही रेसिपी बनवली आहे. Supriya Devkar -
दिंडे (dinde recipe in marathi)
#sharavanqueen # post2 पुरणाचे दिंडे. श्रावणात पुराणाचा नैवेद्य खास केला जातो. नेहमीचे पदार्थ म्हणजे पुरणपोळी, कडबु. आता अजून एक पदार्थ मिळाला पुरणाचे दिंडे. ऐकून माहित होता पण सुप्रिया मोहिते यांच्या मुळे संपूर्ण माहिती मिळाली. छान झाले दिंडे. सर्वाना आवडले. सुप्रिया मोहिते यांनी सांगितल्या प्रमाणे प्रयत्न केला आहे. Veena Suki Bobhate -
पुरण पोळी (puaran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरण पोळी आणि आप्पे रेसिपीजपुरण म्हणजे कुळधर्म कुळाचार म्हणून पुरण घालतात. पुरणाचे दिवे पण करतात, व त्यात काडवाती (तुळशीच्या वाळलेल्या काड्या, त्यावर टोकाला कापूस लावून शुध्द तुपात त्या भिजवायच्या) लावतात, व त्याने कुलदैवताची आरती केली जाते. ह्याला सगळी कडे खूप महत्व आहे.होळी पौर्णिमेला पुरणाला खूप महत्व दिले जाते. तसेच गणपती मध्ये माहेरवाशीण गौरई / महालक्ष्मी साठी खास पुरणाचा नैवेद्य असतो. महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत,होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनालातसेच नवरात्र मध्ये नवमी च्या दिवशी किंवा दसरा म्हणून पुरण घालतात.पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ.लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पुरण पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. Sampada Shrungarpure -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap 25 जुलाई रोजी दाखवलेली ही रेसिपी मी श्रावण सोमवारी काही गोड करावे म्हणून करुन पाहिली.. रंगीत पदार्थ अणि गोड अशी डोळ्यांना व जिभेला उत्तम मेजवानी ठरली... धन्यवाद सुप्रिया.. 😊 Devyani Pande -
दिंंडे (dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #shravanqueen श्रावण महिन्यात एक पारंपरिक पदार्थ शिकायला मिळाला. तसेच सात्विक असल्यामुळे लगेच बनवुन पाहिल. पुरणाचे आपल्या खाद्यसंंस्क्रुतीत असे अनेक पदार्थ आहेत हे कळले. Swayampak by Tanaya -
पुरणपोळी रेसिपी (puran poli recipe in marathi)
#hrपुरणपोळीला महाराष्ट्रत महत्त्वाचा गोड खाद्यपदार्थ मानला जातो. होळीच्या दिवशी देवाला पुरणपोळी नैवेद्य दाखवितात तसेच होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो.महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत,होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते nilam jadhav -
मावा वेढमी (Mava Vedhami recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11 #पुरणपोळीआणिआप्पेरेसिपीज् #पोस्ट१*होळी रे होळी.... पुरणाची पोळी*... अशी बोंब... मनात इतकी ठासून भरली आहे कि,.... कधीही पुरणपोळी बनवली, तरी होळीच्या दिवशी.... लुशलुशित मऊसर पुरणाची... तुप-दुध-कटाची आमटी असा मित्र परिवार असलेली.... गरमा गरम पोळी खायची मज्जा काही औरच...!!🥰😋😋 तर अशी हि, नखरेल-नाजुक नार... सणावारांत, नैवेद्याच्या पानात... एखाद्या *राणी* सारखी रुबाबदार... दिमाखात मिरवत... मराठी थाळीची जणू शानच वाढवते....महाराष्ट्रीयन पारंपरिक मिष्टान्नांतील खासमखास असलेली *पुरणपोळी*... संपूर्ण दक्षिण-पश्चिम भारतीय पाककलेत बहु-नामांकित आहे, ती बनवताना वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थांमुळे...जसे की, चणाडाळ, तुरडाळ, मावा, ओला नारळ, गुळ, साखर, रवा, दुध इत्यादि...(ओबाट्टू-कर्नाटक, वेढमी-गुजरात, उप्पिट्टू-केरळ व तामिलनाडू, बक्षालु-आंध्र व तेलंगाना)महाराष्ट्रात होळी व्यतिरिक्त.... गुढीपाडवा, मकर संक्रांत, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी, याशिवाय गौरी पूजन, दिवाळी लक्ष्मीपूजन किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरणपोळीचे खास महत्त्व...घरोघरी पुरणपोळी ही गुळवणी, तूप, दूध व कटाच्या आमटीसोबत खाल्ली जाते, तसेच कर्नाटकात पुरणपोळी बटाटा आणि वांगी या भाजीसोबतही खातात... (©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
पूरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap #supriyavartakmohitePost 2निनाव प्रमाणे ही पण रेसिपी माझ्यासाठी नविन आहे. नाव ऐकलं होतं पण कधी केली नव्हती. आपल्या ऑथर सुप्रिया ताईंनी खूप छान पध्दतीने रेसिपी करून दाखवली. त्यांच्यामुळे दिंडे बनवण्याचा योग जुळून आला. पूरणपोळीसाठी पूरण बनवते मी पण त्याच पूरणाचे दिंडे पण बनतात हे माहीत नव्हतं. स्मिता जाधव -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen #recipi2#cooksnapSupriya Vartak Mohite ह्याची दिंडे ही रेसिपी रिक्रिएट केली. ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली Supriya Vartak Mohite ह्यांच्यामुळे दिंडे ही रेसिपी माहित झाली. धन्यवाद Supriya मॅडम. Jyoti Kinkar -
कापण्या (Kapnya Recipe In Marathi)
#ASRआखाड / आषाढ तळण-आषाढ सुरु झाला की तळणाचे वेगवेगळे प्रकार केले जातात.आषाढातील नवमी ही कांदे नवमी म्हणून साजरी केली जाते. नवमी पर्यंत कांदे, लसूण, वांगी यांचे पदार्थ करण्याचा नुसता सपाटाच चालू असतो. द्वादशी पासून पुढील पाच दिवस गोड /तिखट पदार्थ करून भगवंताला नैवेद्य दाखविला जातो. त्यात कापण्या, गव्हाची खीर,तिखट,गोडाच्या पुर्या....... नवमी नंतर चार्थुर मासात मात्र चार महिने कांदा, लसूण, वांगी हे पदार्थ बंद करतात, खरे तर हे पदार्थ तामसी व वातुळ असतात त्याचा पावसाळ्यात आरोग्याला त्रास होतो,तसेच चार्थुर मासात व्रत वैकल्ये, सणवार सुरू होतात म्हणून आहारात सात्विक व हलका आहार घेतला जातो. Arya Paradkar -
गुळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9#W9आपल्या पूर्वजांनी सणवार व खाद्य संस्कृती ची सुरेख सांगड घालून दिली आहे,आणि तसे ठोस कारण पण आहे, हिवाळ्यात थंडी पासून संरक्षण करण्यासाठी शरीराला उर्जेची गरज असते ती असे सणवार साजरे करून गोडा धोडाचे पक्वान्न बनविले जात. तीळा ,शेंगदाणे पासून स्निग्धता, गूळात लोह,तसेच बाजरीत उष्णता, या मोसमात अनेक प्रकारच्या भाज्या, धान्य भरपूर प्रमाणात उपलब्ध होते त्याची कृतज्ञता भोगी सारख्या सणाने केली जाते. संक्रांत सणासाठी खास आवर्जून गुळपोळी केली जाते, त्यासाठी गुळ, तीळ, शेंगदाणे चा वापर केला जातो. Arya Paradkar -
दिंडे (dinde recipe in marathi)
#Shravanqueen #cooksnap #Post2#SupriyaVartakMohite Sampada Shrungarpure -
उकडीच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नाग पंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नाग दैवताची पूजा केली जाते.नागपंचमीच्या नैवेद्यासाठी आज मी उकडीच्या करंज्या बनवल्या. चंद्रकोरची थीम पण आहे म्हणून मी करंज्या त्याच आकाराच्या बनवल्या. स्मिता जाधव -
पुरणाची दिंड (purnachi dinde recipe in marathi)
#shravanqueen#post2#रेसिपीबुक #week7आज श्रावणी शुक्रवार निमित्त मी आपल्या ऑर्थर सुप्रिया मोहिते वर्तक यांची पुरणाचे दींडे ही रेसिपी केली आहे. दिंडे खूपच छान झाले होते.छान आणि सात्विक रेसिपी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
More Recipes
टिप्पण्या (10)