मोरिंगा राईस कंट्री सूप (शेवगा पानांचे सूप) (shewaga pananche soup recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#सूप
आपण सगळे नेहमीच विचार करत असतो की ग्रामीण भागातील माणसं किंवा जंगली भागातील आदिवासी काटक कसे काय असतात. त्यांच्याकडे तर शहरी आधुनिक सुख-सुविधा तथाकथित सप्लीमेंट, प्रोटीन नसतात . तरी आयुष्यमान शहरी लोकांपेक्षा जास्त असतं, तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ति सुद्धा छानच असते ..
काय रहस्य असावं ? तर दिवसभर ऊन्हातान्हात मैलोनंमैल चालणे 'ड' जीवनसत्व मिळालं हो . अंगमेहनतीची कामें करणे ,कॅलरी बर्न झाली ना . नैसर्गिक संपत्तीचा आहारात वापर करणे.
शेवगा रानावनात आणि कडेकपारीत घरोघरी, सहजतेने सापडणारा वृक्ष या वृक्षाची पाने, फुले ,शेंगा अहो खोडाची साल सुद्धा औषधी, प्रोटीन, कॅल्शिअम, लोह अजुन बरंच काही खजिना घेऊन तुमच्या सेवेत असतात, शेंगा सोडल्या तर ईतर घटक जवळपास फुकटच मिळतात . शेवग्यांच्या पानांमध्ये अदभुत रोगप्रतिकारशक्ति असुन वजन कमी करण्यासाठी सुद्धा ऊपयोगी आहे, म्हणुनच शेवग्याला "सुपरफुड " संबोधल्या जाते . शेवगा दक्षिण भारतात सर्वात जास्त वापरल्या जातो , हिंदी मध्ये सहजन, मुंगना, दक्षिणी भाषांमध्ये मोरींगा अशी बरीच नावे आहेत ..
ह्या नैसर्गिक संपन्न वनस्पतीचे बरेच प्रकार आपले आदिवासी बांधव नित्य सेवन करत असतात ..
आज केलेले सुप शेवगा पाने अन हातसडीचा तांदुळ (हेमलकसा येथुन आदिवासींनी पिकवलेला विना पॉलिश ) वापरला आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रॅमशेवगा कोवळी पाने
  2. 25 ग्रॅमहातसडीचा तांदूळ
  3. 1/2 इंचदालचिनीचा तुकडा
  4. 3काळी मिरी
  5. 3लवंगा
  6. 1/4 स्पूनसूंठ पावडर
  7. 1 टीस्पूनसाजुक तूप
  8. 1/2 टीस्पूनमीठ
  9. 1/2 टीस्पूनजीरे

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम शेवग्याची पाने खुडून घ्यावीत व तीन-चार पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. तसेच तांदूळ सुद्धा स्वच्छ धुऊन घ्यावेत.

  2. 2

    आता एका मोठ्या भांड्यामध्ये पाने व तांदूळ घालून त्यामध्ये पाऊण लिटर पाणी घालावे व लवंग मिरी दालचिनी जरा भरडून ॲड करावे.सुंठ पावडर सुद्धा घालून कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या घ्याव्यात.

  3. 3

    कुकर मधला भांडं काढून शिजलेले मिश्रण पाणी काढून एकजीव घोटून घ्यावे.आता त्यामध्ये मीठ व आधी काढलेले पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी व तूप जीरे याची फोडणी उकळत्या भांड्यामध्ये घालावी. आपले एक पौष्टिक आरोग्यवर्धक मोरिंगा राईस कंट्री सूप तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या (6)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Waaaa अंजली मॅम जर काही नवीन शिकायचं असेन तर तुमच्याकडून शिकावं

Similar Recipes