डाळीचे लाडू किंवा दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)

Ashwini's Cakes N Classes Ashwini's Cakes N Classes
Ashwini's Cakes N Classes Ashwini's Cakes N Classes @cook_22207170

#लाडू
लाडू म्हटले की अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ.... लग्नसमारंभ असो की वाढदिवस हा एक पदार्थ हमखास ताटात पाहिजेच. आजीच्या हातचे लाडू आणि ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते तशीच बनवण्याचा छोटासा प्रयत्न....

डाळीचे लाडू किंवा दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)

#लाडू
लाडू म्हटले की अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ.... लग्नसमारंभ असो की वाढदिवस हा एक पदार्थ हमखास ताटात पाहिजेच. आजीच्या हातचे लाडू आणि ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते तशीच बनवण्याचा छोटासा प्रयत्न....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-50 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कप = 200 मिली मूग डाळीचे पीठ
  2. 1 कपबेसन पीठ
  3. 1 कपसाखर
  4. 1/2 कपपाणी
  5. 1/8 टीस्पूनमीठ
  6. 1/4 टीस्पूननारंगी कलर खाण्याचा
  7. 2 टेबलस्पूनपिस्ता चे काप
  8. 2 टेबलस्पूनकाजूचे काप
  9. सजावटचांदीचा वर्ख
  10. 250 ग्रामतूप तळण्यासाठी
  11. 1/2 टीस्पूनइलायची पावडर

कुकिंग सूचना

40-50 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बेसन, मूग डाळीचे पीठ, मीठ,खाण्याचा नारंगी कलर आणि थोडे थोडे पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घेणे. नंतर त्याचे छोटे छोटे पाच किंवा सहा बॉल्स तयार करणे. आता या तयार बॉलच्या हातावर किंवा पोलपाटावर पुरी लाटून घेणे. (खाण्याचा कलर नसेल तरी चालेल)

  2. 2

    तयार पुरी तुपामध्ये छान सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर तळून घेणे. तळलेल्या पुरी थंड करून छोटे छोटे तुकडे करणे.

  3. 3

    आता या सर्व पुरी चे तुकडे मिक्सरला पूड करून घेणे.. पुरीची पुड /पावडर आपल्याला बारीक हवी. खूप जाडसर नको

  4. 4

    एका पातेल्यात साखर आणि पाणी घेऊन त्याचा एकतारी पाक तयार करणे. एक तारी म्हणजे जेव्हा तुम्ही दोन बोटांमध्ये पाक घेता तेव्हा त्याचा एक तार निघाला पाहिजे. तोपर्यंत तुम्हाला तो पाक शिजवायचा आहे.इथे साखर आणि पाण्याचं प्रमाण दोनास-एक असे आपल्याला घ्यायचे आहे..म्हणजे एक वाटी साखर असेल आर्धी वाटी पाणी घ्यायचे आहे असे..

  5. 5

    तयार पाक थोडा थंड झाल्यावर पुरीच्या बारीक केलेल्या मिश्रणामध्ये टाकून छान मिक्स करून त्यात काजू,पिस्ता,वेलची पूड टाकून परत एकदा मिक्स करणे. आणि आता हे सारण अर्धा तासासाठी झाकून ठेवणे.

  6. 6

    आता तयार सारणाचे आपल्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे लाडू वळून घेणे.. आवडत असल्यास चांदीचा वर्क आणि पिस्त्याचे काप लावून सजावट करणे.. या प्रमाणात 14 मिडीयम लाडू तयार होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini's Cakes N Classes Ashwini's Cakes N Classes
रोजी

Similar Recipes