दामटीचे लाडू (damtiche ladoo recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#gur गणेशोत्सव हा सण सर्वांच्या आवडीचा सण आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी उत्साहाने साजरा करतात... गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर सर्वांची लगबग सुरू होते गृहीणी गोड गोड पदार्थ बनवण्यात व्यस्त होतात मुलं डेकोरेशनच्या कामांमध्ये व्यस्त राहतात सर्व जण अगदी उत्साहाने आपलं काम पार पाडत असतात....
मी बाप्पाला दामटीचे लाडू बनवले आहेत... गणपतीचे दर्शन घ्यायला सर्वजण येतात तेव्हा त्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायला खूप छान आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
२० लोकांसाठी
  1. 4 वाट्याबेसन चे पीठ
  2. तळणीसाठी तूप किंवा तेल
  3. वेलची पूड
  4. ड्रायफ्रूट्स, मनुके
  5. 3 वाट्यासाखर

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    प्रथम बेसन पिठामध्ये चिमूटभर मीठ घालून पीठ मळून घ्या

  2. 2

    दहा मिनिटं हे पीठ भिजायला ठेवा याचे छोटे छोटे गोळे करून मिडीयम साईच्या पुर्‍या लाटून घ्या आणि मिडीयम फ्लेम वरती तुपामध्ये तळून घ्या

  3. 3

    सर्व पुऱ्या तळून झाल्यानंतर दहा मिनिटं थंड व्हायला ठेवा तो पर्यंत त्याचा पाक बनवून घेऊया

  4. 4

    पाकासाठी तीन वाट्या साखर आणि दिड वाटी पाणी घाला हे मिश्रण गॅस वरती उखळाला ठेवा चमच्याने सतत ढवळत राहा याचा एक तारी पाक बनवून घ्या यामध्ये वेलचीपूड घाला

  5. 5

    आता वरील पुऱ्या थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे करून मिक्सरमधून वाटून घ्या या पद्धतीने या सर्व दामट्या किंवा पुऱ्यांचे मिक्सरला वाटून चुर्मा बनवून घ्या

  6. 6

    आता या चुरम्या मध्ये आपण बनवलेला एक तारी पाक हळू हळू चमच्याने मिक्स करत रहा. एकदम सर्व ओतू नका थोडा थोडा मिक्स करा हे मिश्रण पूर्ण भिजत असल्यास पाक शिल्लक राहिला तर वाटीत बाजूला तसाच राहू द्यावा. या मध्ये दोन चमचे तूप घाला मिश्रण झाकून मुरायला ठेवा

  7. 7

    आता यावर झाकण ठेवून हे मिश्रण एक तास तसेच ठेवा पाक यामध्ये चांगला मुरतो आता एक तास आणि चेक करा लाडू वळता येत आहेत का मिश्रण मुलं नसेल तर आणखी थोडा वेळ तुम्ही ठेवू शकता पण साधारण एक तासांमध्ये लाडू बांधायला येतात

  8. 8

    लाडू बांधताना यावर ती तुम्ही ड्रायफ्रूट्स लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे

  9. 9

    बाप्पांसाठी नेवेद्य तयार आहे याला चुरम्याचे लाडू असेही म्हणतात नक्की करून पहा बेसन लाडू पेक्षा झटपट बनतात चवीला तर खूप सुंदर लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

Similar Recipes