गरमागरम,तिखट, चमचमीत टोमॅटो फ्राइड राइस (tomato fried rice recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#फ्राइड

पावसाळी मोसम, गणपती बाप्पाचे मोदक आणि सोबत, गरमागरम ,तिखट, चमचमीत टोमॅटो फ्राइड राइस ही एक स्वादिष्ट डिश आहे.

टोमॅटो फ्राइड राइस ही झटपट बनणारी, टेस्टी, आणि आरोग्याला पोषक अशी डिश आहे. टोमॅटो फ्राईड राइस ला तुम्ही नास्ता, लंच आणि डिनर ला पण बनवून खाऊ शकता. तर चला मग टोमॅटो फ्राइड राइस कमी साहित्यात कसा बनाविला जातो
हे आपण पाहूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. साहित्य :-
  2. १+१/२ वाटी बासमती तांदूळ किंवा घरी जे आहेत ते
  3. 2टोमॅटोची प्युरी
  4. 1 टीस्पूनमेथी दाना
  5. 1मोठा कांदा बारीक चीरलेला
  6. 10पाकळ्या लसुन बारीक कापलेला
  7. 3ते ४ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या
  8. 1 टीस्पूनहिंग
  9. मीठ चवीप्रमाणे पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम बासमती तांदूळ आणि मेथी दाना २०मिनिटें पाण्यात भिजवून ठेवणे. ह्या नंतर तांदूळ आणि मेथी दाण्याचे पाणी निथळून घ्या. तो पर्यन्त फोडणीचे तयारी करने.

  2. 2

    आता एका कुकर मधे १चमचा तेल गरम करायला ठेवा.त्या गरम तेलात मोहरी, जीरे तडतडू द्या.

    नंतर फोडणीत हींग घालून कांदा परतून घ्यावा मग लसूण. हिरवी मिरची टाकून चांगले परतून थोडे भाजलेले शेंगदाणे टाकून परतून घ्या. टोमॅटो प्युरी टाकून तेल वर येईपर्यंत परतून घ्या.

  3. 3

    नंतर निथळून ठेवलेले तांदूळ आणि मेथीदाणे ५मिनिटें परतून घेणे. चवीनुसार मीठ टाकून परतून घेतले. त्यानंतर तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी टाकून कुकरच्या १ते२ शिट्या होऊ द्या.

  4. 4

    आपला गरमागरम,तिखट, चमचमीत टोमॅटो फ्राइड राइस तयार झाला. त्यावर कोथिंबीर टाकून सजवा आणि लोणच्यासोबत सर्वे करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes