बनाना पॅन केक (banana pancake recipe in marathi)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

बनाना पॅन केक (banana pancake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 1 (1/2 कप)मैदा
  2. 1पिकलेले केळ
  3. 1अंड
  4. 2 टेबलस्पूनपीठी साखर
  5. 4 टीस्पूनअमूल बटर
  6. 1 कपदूध
  7. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  8. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  9. 4-5 टीस्पूनमध
  10. 2 थेंबवॅनिला इसेंस
  11. चिमुटभरमीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    वरील नमूद केलेले सर्व साहित्य खालील फोटोमध्ये दर्शवील आहे. केळ्याचे लहान तुकडे करून घ्या. मिक्सर मध्ये एकजीव केल्याने केक ला लम्स नाही रहाणार.

  2. 2

    मिक्सरच्या जार मध्ये मैदा, पीठी साखर व बटर घालून घ्या.

  3. 3

    यांत आत्ता मीठ, बेकींग सोडा, बेकींग पावडर व दूध घाला.

  4. 4

    यांत एक अंड फोडून घाला. अंड्याचा वास जाण्यासाठी वॅनिला इसेंस घाला. वॅनिला इसेंस आवडत नसल्यास वेलची पूड घालावी.

  5. 5

    डोशाच्या बॅटर प्रमाणे जाडसर पातळ बॅटर होईल, ते साधारण १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा.

  6. 6

    पॅन वर बटर लावून घ्या. मी इथे अप्पम पॅन वापरला आहे, जो मला कुकपॅड कडून बक्षिस स्वरूपात प्राप्त झाला आहे. यांवर चमच्याने बॅटर सोडा. पॅन केक थोडा जाड पसरवा. वरून झाकण ठेवा.

  7. 7

    साधारण पाच मिनिटांनी झाकण काढून पहा. गॅसची आच मध्यमच असू द्या. नंतर बाजू उलथून पून्हा २ मिनिटे ठेवा.

  8. 8

    नंतर हे पॅन केक एका प्लेट मध्ये काढून वरून मध पसरवा. साधारण पाच दहा मिनिटे मध यांत मुरू द्या. लहान मुलांसाठी हा परिपूर्ण नाश्ता आहे. केळ्यांऐवजी वेगवेळी फळ किंवा ड्रायफ्रुट देखील वापरू शकता. अगदीच हेल्थ काॅन्शियस असाल तर मैद्या ऐवजी कणिक ही वापरली तरी चालेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

Similar Recipes