पिझ्झा पराठा (pizza paratha recipe in marathi)

Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
Andheri
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. पीठ मळण्यासाठी
  2. 2 कपगव्हाचे पीठ
  3. 1 कपमैदा
  4. 1 टेबलस्पूनबेसन
  5. 1/2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  6. 1/2 टेबलस्पूनहळद
  7. 1/2 टेबलस्पूनतिळ
  8. सारणासाठी
  9. 1 कपपनीर
  10. 1 कपचिज
  11. 1/2 कपकिसलेले बटाटे
  12. 1/2 कपकांदा
  13. 1/2 कपशिमला मिरची
  14. 1-2हिरव्या मिरच्या
  15. आवश्यकतेनुसार पिझ्झा सॉस
  16. 1 टेबलस्पूनओरिगॅनो
  17. 1 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  18. आवश्यकतेनुसार मिठ
  19. आवश्यकतेनुसार तेल / तुप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका ताटात मैदा, गव्हाचे पीठ, बेसन, लाल तिखट, हळद, तीळ व मीठ घेऊन. हे सगळे मिश्रण एकत्र करावे मग त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगले मळून घ्यावे. हा गोळा थोडा वेळ झाकून ठेवावे.

  2. 2

    मग सारण बनवण्यासाठी किसलेले पनीर, बटाटे व चीज घ्यावे, मग त्यामध्ये कापलेला कांदा, शिमला मिरची व हिरवी मिरची घालावी. मग त्यामध्ये थोडे मीठ घालून हे सगळे मिश्रण एकत्र करावे.

  3. 3

    मग तयार पिठाचे गोळे करून त्याची चपाती लाटून घ्यावी. यासाठी आपण दोन चपात्या वापराव्या, एका चपातीवर पिझ्झा सॉस लावून त्यावर तयार मिश्रण पसरवून घ्यावी त्यावर चिली फ्लेक्स व ओरिगॅनो घालावे.

  4. 4

    मग दुसरी चपाती पहिल्या चपातीवर घालून ते फोर्कच्या साह्याने कडा बंद करून घ्याव्यात. मग तवा गरम करून त्यावर तेल किंवा तूप घालून दोन्ही बाजूंनी लालसर भाजून घ्यावे.

  5. 5

    अशाप्रकारे पिझ्झा पराठा खावयास तयार झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
रोजी
Andheri

टिप्पण्या

Similar Recipes