गाजर टोमॅटो ऑम्लेट (gajar tomato omelette recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#GA4
#week2
#गाजरटोमॅटोऑम्लेट
Spinach Eggless fluffy ऑम्लेट हे कीवर्ड घेऊन भाग्यश्री लेले यांच्या रेसिपीत थोडा बदल करून कूकस्नप केला.

गाजर टोमॅटो ऑम्लेट (gajar tomato omelette recipe in marathi)

#GA4
#week2
#गाजरटोमॅटोऑम्लेट
Spinach Eggless fluffy ऑम्लेट हे कीवर्ड घेऊन भाग्यश्री लेले यांच्या रेसिपीत थोडा बदल करून कूकस्नप केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
3मेंबर्स
  1. साहित्य :
  2. 2गाजर मिक्सर मधे बारीक केलेली पेस्ट
  3. 1टमाटर मिक्सर मध्ये पेस्ट केलेली
  4. 2 कपरवाळ तांदूळ पीठ
  5. 1 कपगहु पीठ
  6. 1/2 कपदही
  7. 1मोठा कांदा बारीक चिरून
  8. 6-7हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  9. 7-8लसूण पाकळ्या बारीक चिरून
  10. 1 टीस्पूनजिरे
  11. 1/2 कपकोथिंबीर
  12. चवीनुसार मीठ
  13. 1इनो फ्रुट सॉल्ट
  14. 1/2 कपतेल
  15. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम मिक्सरमधे गाजर, टोमॅटो, दह्याची पेस्ट करणे.नंतर एका वाडग्यात ही पेस्ट आणि तांदूळ पीठ, गहू पीठ व्यवस्थित एकत्र करणे. ह्या मिश्रणात बारीक कापलेला कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण,कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालावे आणि मिश्रण एकजीव करावे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी ओतावे एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको मध्यम पाहिजे.

  2. 2

    मिश्रण खूप फेटून घ्यावे. म्हणजे मिश्रण खूप हलके होते. 30 मिनिटांसाठी झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवून देणे. आता वरील मिश्रणात अर्धा छोटा चमचा इनो घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.

  3. 3

    आता तवा गॅसवर गरम करा त्यात थोडेसे तेल टाका. नंतर एक चमचा बॅटर टाकून थोडे पसरून द्या. नंतर गाजर टोमॅटो ऑम्लेटला व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्या व सोनेरी होऊ द्या. परत ऑम्लेटला पलटून तेल लावून सोनेरी होईपर्यंत झाकण ठेवून शेकून सोनेरी होऊ द्या.

  4. 4

    अशा रीतीने तयार झालेले गरमागरम गाजर,टोमॅटो वेज पौष्टिक ऑम्लेट डिशमध्ये ठेवून बटाट्याची भाजी आणि टोमॅटो सॉस सोबत सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या (3)

Similar Recipes