डोसा फुल मिल (dosa recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

#GA4 #week3

#Dosa
डोसा तर सगळ्यांचा आवडता आहे, आमच्या कडे महिन्यातून एकदा तरी डोसा बनवून होतो, त्याचीच माझी स्वतः ची ही रेसिपी. आवडते काय ट्राय करून पाहा.

डोसा फुल मिल (dosa recipe in marathi)

#GA4 #week3

#Dosa
डोसा तर सगळ्यांचा आवडता आहे, आमच्या कडे महिन्यातून एकदा तरी डोसा बनवून होतो, त्याचीच माझी स्वतः ची ही रेसिपी. आवडते काय ट्राय करून पाहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
3-4 सर्व्हिंग्ज
  1. डोसा साठी
  2. 3 कपतांदूळ
  3. 1 कपउडीद डाळ
  4. 1 कपजाड पोहे
  5. 1 टीस्पूनमेथी दाणे
  6. चवीपुरते मीठ
  7. गरजेपुरते पाणी
  8. बटाट्याच्या भरीत साठी
  9. 5-6बटाटे
  10. 1कांदा चिरलेला
  11. 5मिरची
  12. 6-7कडीपत्ता
  13. 1 टीस्पूनजिर मोहरी
  14. 3 टेबलस्पूनतेल
  15. 1 टीस्पूनहळद
  16. चवीपुरते मीठ
  17. सांबार साठी
  18. 1/2 कपतूर डाळ
  19. 1/2 कपमसूर डाळ
  20. 1शेवगा काडी
  21. 50g कोहळा
  22. 2वांगी
  23. 1कांदा
  24. 2 टेबलस्पूनचिंच
  25. 1 टेबलस्पूनसांबार मसाला
  26. 1 टेबलस्पूनतिखट
  27. 1 टीस्पूनमोहरी
  28. 1 टीस्पूनमेथी दाणे
  29. 2लाल मिरची
  30. 6-7कडीपत्ता
  31. 4 टेबलस्पूनतेल
  32. चिमुटभर हिंग
  33. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम उडीद डाळ व तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, मग त्यात जाड पोहे व मेथी घालुन 10 तास भिजवा, त्यानंतर 10 तासाने बारीक वाटून घ्या व 10 तास त्याला आंबु द्या. बाजूलाच एका वाटीत पाणी घेऊन चिंच साधारणतः 2-3 तास किंवा रात्रभर भिजू घाला, त्यानंतर चिंचेला कुस्करून चहा गाळणीने गाळून घ्या.

  2. 2

    सांबारसाठी - तूर डाळ व मसूर डाळ स्वच्छ धुवून घ्या त्यात कापलेले शेवगा, कोहळा, वांगी आणि कांदे घालून कुकर मध्ये 4 शिट्ट्या होईस्तोवर शिजवून घ्या. त्यानंतर चिंचेच्या पाण्यात सांबार मसाला, तिखट घाला. फोडणीसाठी एका भांड्यात तेल घ्या त्यात मोहरी, मेथी दाणे, लाल मिरची, हिंग, कडीपत्ता घाला, त्यांनतर चिंचेचे पाणी घाला मग शिजवलेली डाळ, पाणी व मीठ घालून शिजवून घ्या.

  3. 3

    बटाट्याच्या भरीतसाठी - एका कढईत तेल गरम करा त्यात जिर मोहरी, कडीपत्ता, कांदा, मिरची घालून शिजवून घ्या. त्यांनतर त्यात हळद व मीठ घाला त्यानंतर उकडलेला बटाटा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  4. 4

    डोसाच्या मिश्रणात मीठ व गरजेपुरते पाणी घाला, त्यांनतर दोसाच्या तव्यावर तेल लावून गोल वाटीने अर्धी वाटी मिश्रण घाला व त्याच वाटीने गोल आकार द्या व 2 मिनिट शिजू द्या त्यानंतर दुसरी बाजून पण 1 मिनिट शिजू द्या.

  5. 5

    सांबार, बटाट्याच्या भाजी व ओल्या नारळाच्या चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
रोजी

Similar Recipes