डाळ ढोकाळी (dal dhokali recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#GA4#week 4थंडीच्या दिवसात गरमागरम डाळ ढोकळी खायला मस्त. डायटिंग करणार्यांना एकउत्तम पर्याय

डाळ ढोकाळी (dal dhokali recipe in marathi)

#GA4#week 4थंडीच्या दिवसात गरमागरम डाळ ढोकळी खायला मस्त. डायटिंग करणार्यांना एकउत्तम पर्याय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4जणांसाठी
  1. 200 ग्रॅम-गव्हाचे पीठ
  2. 200 ग्रॅम-तुरडाळ
  3. 1 चमचा-राई
  4. 1 चमचा-जिरं
  5. 1 चमचा-लाल मिरची पावडर
  6. 1/2 चमचा-हळद
  7. 1 चमचा-धने पावडर
  8. 1 चमचा-जिरे पावडर
  9. 1 चमचा-मेथी दाणे
  10. 5-6-कढीपत्ता पाने
  11. 1 चमचा-आलं पेस्ट
  12. 1 चमचा-लसूण पेस्ट
  13. 2-3-हिरव्या मिरच्या
  14. 2 चमचे-चिंचेचा कोळ
  15. 1 टेबलस्पून-किसलेला गूळ
  16. 1 टेबलस्पून-कसुरीमेथी
  17. 1 चमचा-हिंग
  18. 1टेबलस्पून-कोथिंबीर
  19. 1 टेबलस्पून-तुप
  20. 2 टेबलस्पून-तेल
  21. 1 लिटर- पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम तूर डाळ स्वछ धुवून. 300मिली पाणी घालून कुकरला तीन शिट्या घेऊन शिजवावे.गव्हाचे पीठ मीठ तेल आणि थोडं थोडं पाणी घालून थोडं घट्ट मळून घेणे. तेलाचं हात लावून 10मिनटं झाकून ठेवणे

  2. 2

    डाळ चांगली घोटून घ्यावी. एका मोठ्या पातेलीत तेल घालावे तेल गरम झाल्यावर सर्व फोडणीचे साहित्य घालावे. फोडणी तडतडल्यावर त्यात डाळटाकावी सर्व मसाले चिंच व गुळ आणि मीठ घालून उकळवायला ठेवावी.

  3. 3

    मळलेलं पीठ परत चांगले मळून घ्यावे. त्याचे तीन गोळे करून पोळी पेक्षा थोडे जाडे लाटून घ्यावे आणि त्याचे छोटे तुकडे कापून घायवेत

  4. 4

    उकळलेल्या डाळीत पोळीचे तुकडे घालावेत. दहा मिनटं त्यात शिजवावे.

  5. 5

    डाळ ढोकळी तयार. वरूनसाजूक तुप घालावे कोथिंबीर घालून सजवावे

  6. 6

    पापड, लोणचे, कांदा या बरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

Similar Recipes