डाळ ढोकळी (dal dhokli recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#पश्चिम #गुजराथ
#शमा मांगले#ह्यांची बघुन केली. मस्त झाली अशी घरातून पावती मिळाली,थोडा बदल केलाय म्हणजे मी शेंगदाणे घातलेत.

डाळ ढोकळी (dal dhokli recipe in marathi)

#पश्चिम #गुजराथ
#शमा मांगले#ह्यांची बघुन केली. मस्त झाली अशी घरातून पावती मिळाली,थोडा बदल केलाय म्हणजे मी शेंगदाणे घातलेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतूरडाळ
  2. 1.5 कपगव्हाचे पीठ
  3. 1/4 कपशेंगदाणे
  4. 1 टीस्पूनराई
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1 टीस्पूनमेथीदाणे
  7. 1 टीस्पूनहिंग
  8. 1 टीस्पूनजिरेपूड
  9. 1 टीस्पूनधणे पूड
  10. 1 टीस्पूनलाल तिखट
  11. 1 टीस्पूनआललसुण पेस्ट
  12. 1 टीस्पूनमिरची पेस्ट
  13. 1 टीस्पूनगरम मसाला
  14. 2सुक्य्या लाल मिरच्या
  15. 2/3कढीपत्ता
  16. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
  17. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  18. 2 टेबलस्पूनगुळ
  19. 1 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  20. 1/4 कपतेल
  21. 2 टेबलस्पूनतूप
  22. पाणी

कुकिंग सूचना

40मिनिटे
  1. 1

    डाळ धुवून 15/20मिनीटे भिजत ठेवणे व साधारण 3पट पाणी घालून 1/2टीस्पून हळद व हिंग घालून शिजवणे व घोटून घेणे.

  2. 2

    पिठ घेऊन त्यात 2टेबलस्पून तेल घालणे व जिरे पूड, धणेपुड,लाल तिखट,हळद,गरम मसाला, मीठ हे सर्व अर्धा अर्धा चमचा घालणे व पिठ चपाती साठी मळतो तसे मळणे.झाकून बाजूला ठेवा.

  3. 3

    फोडणीसाठी कढईत उरलेले तेल घालून गरम झाले कि प्रथम राई तडतडली कि जिरे, मेथ्या कढीपत्ता,शेंगदाणे घालणे व चिंच गुळ सोडून सर्व फोडणीत घालणे कसुरी मेथी नि लाल तिखट सर्वात शेवटी घालणे व डाळ फोडणीत घालून तिन कप पाणी घाला.चिंच, गूळ, मीठ घालून डाळ उकळत ठेवणे.

  4. 4

    आता पिठाचे तिन गोळे करा व चपाती लाटा जास्त पातळ नको व खालील खालीलप्रमाणे सुरीने कापा व एक दोन करत उकळत्या डाळीत घालणे नाहीतर त्या चिकटतात.जर डाळ ढोकळी जाड वाटली तर आणखीन पाणी घाला.

  5. 5

    डाळ ढोकळी मधे तुप घाला,कोथिंबीर पेरा, आता डाळ ढोकळी खाण्यास तयार आहे भाता बरोबर खाऊ शकता किंवा नुसती ही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes