रंगीत चिरोटे (chirote recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#अन्नपूर्णा

रंगीत चिरोटे (chirote recipe in marathi)

#अन्नपूर्णा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ कप मैदा
  2. ४ टेबलस्पुन बारीक रवा
  3. चवीनुसार मीठ
  4. 1/2-3/4 कप दुध
  5. 2 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  6. 2 टेबलस्पूनतूप
  7. तेल आवश्यकतेनुसार
  8. पिठी साखर आवश्यकतेनुसार
  9. खाण्याचे रंग

कुकिंग सूचना

  1. 1

    मीठ, रवा आणि मैदा एकत्र करून घ्यावे... त्यामधे दोन पळी कडकडीत गरम तेलाचे मोहन घालावे... आणि दुधात पिठ मळून घ्यावे... आणि अर्धा तास rest करावं...

  2. 2

    पिठ थोडा नरम मळावं... रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे पिठ थोड घट्ट होत...

  3. 3

    साटा बनवण्यासाठी तुप आणि कॉर्नफ्लोअर घोटुन घ्यावे...

  4. 4

    पिठाचे गोळे करून लाटुन घ्यावे... 1 कप standard measure चे ६ सारखे गोळे होतात...

  5. 5

    रंग हा पिठामध्ये न टाकता साट्या मधे घालायचा आहे... हे दोन प्रकारे करू शकतो पहिली पद्धत म्हणजे साटा वेगवेगळ्या वाटी मधे घेवून वेगवेगळ्या रंगांचे साटे तयार करणं... आणि दुसरी म्हणजे चपाती वर साठा घालावा आणि साट्यावर आवडिचा रंग घालून बोटाने मिक्स करून मग पसरवावे... मी दुसऱ्या पद्धतीने केले... अशाप्रकारे एकावर एक तीन चपाती ठेवून घट्ट रोल करून घ्यावा...

  6. 6

    रोल चे साधारण एक इंच चे तुकडे करून घ्यावे...

  7. 7

    प्रत्येक तुकडा प्रथम बोटाने दाबून मग लाटावा...

  8. 8

    तयार चिरोटे छान तळुन घ्यावे... आणि गरम असतानाच त्यावर चहागाळणीच्या सहाय्याने पिठी साखर भुरभुरावी... आपल्या आवडिनुसार... गरम असतानाच पिठीसाखर घातल्याने ती मिक्स होवून जाते...

  9. 9

    आणि आपले रंगीत गोड चिरोटे तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes