पिंकी रोज चिरोटे (Pink rose chirote recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

पिंकी रोज चिरोटे (Pink rose chirote recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
60 नग
  1. 1/2 किलोमैदा
  2. 1/4 कपबारीक रवा
  3. 1 कपसाखर
  4. 1/4 कपतूप/तेल
  5. 1/2 चमचावेलची पूड
  6. तळण्यासाठी तेल
  7. 5 चमचेसाठ्या साठी कॉर्नफ्लोअर व तूप
  8. दूध/पाणी कणिक मळण्यासाठी
  9. 1/2 चमचारेड फूड कलर
  10. 1/2 चमचामीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम रवा व मैदा चाळून घ्या,1/4 कप तूप गरम करून त्याचे मोहन मैदात ओतून घ्या,त्यात मीठ व फूड कलर घाला

  2. 2

    मग दूध घालून कणीक मळून घ्या आणि कणिक 30 मिनिटे झाकून ठेवा मग त्या कणकेचे समान गोळे बनवून घ्या

  3. 3

    साठ्यासाठी कॉर्नफ्लोअर व तूप एकत्र करून फेटून घ्या,साखर व वेलचीपूड एकत्र करून ते मिक्सरला दळून घ्या

  4. 4

    कणकेचे केलेल्या गोळ्यांची पोळी लाटून घ्या,मग पोळीवर 1/2 चमचा साठा हाताने पसरवून लावून घ्या मग त्यावर अनेक पोळी ठेवून त्यावर पुन्हा साठा लावून त्यावर मग पोळी ठेवून त्यावर साठा लावून घ्या अश्याप्रकारे एकावर एक अश्या 3 पोळ्या घ्या

  5. 5

    मग त्या एकावर एक अश्या ठेवलेल्या 3 पोळ्या चा गुंडाळुन रोल बनवून घ्या त्याच्या कडा पाणी लावून नीट बंद करून घ्या,मग त्याचे 1/2 इंचाचे तुकडे कापून घ्या

  6. 6

    मग एक -एक गोळा थोडासा लाटुन घ्या मग चिरोटा मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तळून घ्या,तळून बाहेर काढल्यावर त्यावर गाळणीने पिठीसाखर चिरोट्यावर दोन्ही बाजूला भुरभुरावी

  7. 7

    मग आपले तयार कुरकुरीत पिंकी रोज चिरोटे सर्व्ह करा.टीप :साठा जास्त लावू नका नाही तर चिरोटे तेलात पूर्ण सुटतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

Similar Recipes