पाकातले चिरवंट(चिरोटे) (pakatil chirote recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#पाकातलेचिरोटे
चिरवंट करणे म्हणजे अगदी सुगरणीचेच काम....पण आज हे करून पाहीलेच आणि मस्त गोड,खुसखुशित आणि छान पापूद्रे सुटलेले झाले.तूम्ही ही करून बघा मग पाकातले चिरवंट....

पाकातले चिरवंट(चिरोटे) (pakatil chirote recipe in marathi)

#पाकातलेचिरोटे
चिरवंट करणे म्हणजे अगदी सुगरणीचेच काम....पण आज हे करून पाहीलेच आणि मस्त गोड,खुसखुशित आणि छान पापूद्रे सुटलेले झाले.तूम्ही ही करून बघा मग पाकातले चिरवंट....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 300 ग्रॅममैदा
  2. 1 वाटीसाखर
  3. 1+1/2 वाटी पाणी
  4. 2 चमचेरवा
  5. 1 चमचावेलची पूड
  6. 1 वाटीतूप
  7. 3/4 वाटीकॉर्नफ्लोर
  8. तळण्यासाठी तेल
  9. पिस्ता बदामचे बारीक काप
  10. 1 चमचापिठीसाखर
  11. चिमूटभरमीठ
  12. 2 चमचेलिंबूरस
  13. 1/2 वाटीदही
  14. 2 थेंबकेशरी फूड कलर

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम मैदा घेऊन त्यात रवा,मीठ अर्धी वाटी तूप गरम करून मोहन आणी थोडे दही घालून गोळा भिजवून घ्यावा.पंधरा मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    राहीलेल्या अर्धी वाटी तूपात काॉर्नफ्लोर घालून छान फेसून साटा तयार करून घ्या.

  3. 3

    आता मैदाचा गोळा चांगला मळून त्याचे गोळे करून घ्या.

  4. 4

    आता यातील एक गोळा घेऊन पोळीसारखा लाटून घ्या.त्यावर कॉर्न चा साटा लावून घ्या.त्यावर अजून एक पोळी लाटून ठेवा.त्यालाही साटा लावा.अशा एकावर एक तीन पोळ्या ठेऊन गुंडाळी करून घ्या.

  5. 5

    आता याचे एकसमान चाकूने काप करून घ्या.

  6. 6

    आता याचे लेयरची बाजू वर ठेऊन छोटे चिरोटे लाटून घ्या.असेच सगळे लाटा.हलक्या हाताने लाटा.

  7. 7

    आता सगळे लाटून झाल्यावर कढईत तेल गरम करून मंद आचेवर तळून घ्या.

  8. 8

    आता साखरेचा आपला नॉर्मल पाक करून घ्या.पाक झाला की त्यात वेलची पूड घाला.दोन थेंब केशरी फूड कलर घाला.थोडा लिंबूरस घाला

  9. 9

    आता हे सगळे चिरोटे वर हा पाक थोडा थोडा करून घाला.व दहा मिनिटे हे चिरवंट पाकात मूरू द्या.

  10. 10

    आता चिरवंट खाण्यासाठी तयार आहेत.वरून पिठीसाखर पिस्ताबदाम च्या काप नी सजावट करून serveकरा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes