स्वास्थ्यवर्धक चटपटीत मूग चाट (moong chat recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#sprouted
#मुगचाट
#ब्रेकफास्ट
#मुंगउसळ
#पौष्टिकब्रेकफास्ट
#sproutedgrains
#GA4
#week11
मधे sprouted हे key word वापरुन स्वास्थ्यवर्धक चटपटीत मूग चाट बनवली आहे.
मोड काढलेल्या मुगाची (कडधान्याची ) चाट म्हणजे पोषणाचा खजीना. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. तर चला आज करूयात पौष्टिक न्याहारी अंकुरित मुगाची मोड काढलेली बिना तेलाची स्वास्थ्यवर्धक चटपटीत अंकुरित मूगाची चाट .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
3  सर्व्हिंग्ज
  1. साहित्य :
  2. २+१/२ टेबलस्पूनमूग
  3. 2मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
  4. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  5. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेला कोथिंबीर
  6. 2 टीस्पूनलिंबुचा रस
  7. 1 ते २ चिमूटभर हळद
  8. 1ते २ चिमूटभर जीरे ,मिरे,
  9. चाट मसाला
  10. चवीपुरते काळे मीठ किंवा
  11. शेंदे मीठ

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    कृती :

    स्टेप १: प्रथम मुगाला एका पाण्यात ८ ते १० तास भिजवावीत. पाण्याची पातळी साधारण मुगाच्या वरती पाणी टाका. मुग नीट भिजली कि त्यातील न भिजलेली, कडक राहिलेले मुग वेचून काढून टाकावीत. स्वच्छ केलेले मुग सूती कापडात घट्ट बांधून चाळणीत ठेवावी. चाळणी एका स्टँडवर ठेवावी. ७ ते १० तासांनी मोड येतील. मुगाला मोड आले कि चाट बनवायच्या आधी पाण्यात घालून लगेच उपसावेत. यामुळे मूग थोडे ओलसर होतात त्या मुळे साध्या कुकरमध्ये किंवा स्टीम कुकर मध्ये वाफवायला सोपे जाते.

  2. 2
  3. 3

    स्टेप 2: आता कुकर घ्या त्यात जाळी आणि पाणी घाला त्या कुकरच्या जाळीवर कुकरच्या भांड्यात मोड आलेल्या मुगाला हळद आणि थोडे मीठ लावून भांड्यात टाका पाणी घालू नका. कुकरचे झाकण शिटी लावून बंद करून वाफवून घ्या १ किंवा २ शिट्या झाल्या की कुकर थंड होऊ द्या किंवा स्टीम कुकरमध्ये मोड आलेले मुग १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या.

  4. 4
  5. 5

    स्टेप ३: मुग वाफवेपर्यंत एका ताटात कांदा,टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेणे. मुग वाफाविल्यानंतर त्याच ताटात वाफवलेले गरम मुग प्लेट मध्ये टाकून त्यावर कांदा, टोमॅटो, जीरे मिरे पूड,चाट मसाला तुमच्याआवडीनुसार, चवी प्रमाणे घालून सर्व सामुग्री मिक्स करा.

  6. 6

    स्टेप ४: तयार आहे सकाळच्या ब्रेकफास्ट साठी (न्याहारी) मोड काढलेली बिना तेलाची चटपटीत मुग चाटला. कोथिंबीरेने सजवून गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes