मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #Week13 की वर्ड- Chille..मिरची
लवंगी मिरची कोल्हापूरची...
एवढीशी कार्टी कानामागून आली आणि तिखट झाली.. सांगा बरं या कोड्याचे उत्तर .. हो तीच ती.. सुबक ठेंगणी ठुसकी.. पण जिभेवर जहाल तोरा मिरवणारी.. भल्याभल्यांना घायाळ करणारी.. नुसत्या नावानेच,वासानेच मेंदूला झिणझिण्या आणणारी ..तिच्या ठसक्यानेच अर्धमेली अवस्था करणारी..पहिल्या घासातच नाका तोंडातून धूर, कपाळावर घर्मबिंदु, चेहऱ्याला जिभेला शरीराला आग लावणारी .. अशी ही स्वभावाने तिखट असली तरी आपण तिच्या याच रूपा गुणांवर परत परत भाळतो अशी.. आणि तिला कायमचे आपल्या जीवनात स्थान देतो.. स्थान देतो कसले‌.. तिच्याशिवाय जगणेच अशक्य ..कारण तिच्या अस्तित्वामुळेच आपले खाद्यजीवन पर्यायाने सारे जीवन रुचकर झालंय..परम सुखाचा अनुभव देणारी अशी ही नखरेल नार लवंगी मिरची कोल्हापूरची..हिची मोहिनी इतकी की लसूण मिरची कोथिंबिरी..अवघा झाला माझा हरी याअभंगापासून नाव कशाला पुसता मी हाये कोल्हापूरची..मला हो म्हनत्यात लवंगी मिरची... लवंगी मिरची मी कोल्हापूरची लगी तो मूश्किल होगी..हाय हाय मिरची उफ उफ मिरची म्हणत एखाद्या रुपगर्वितेला, स्त्री ला लावलेल्या विशेषणापर्यंत या तिखटाच्या राणीचा प्रवास ..थांबा थांबा हा प्रवास इथेच नाही थांबत बरं..तो आलं लसूण मिरची एकदा कडाक्याचे भांडले..मग आजीने त्यांना कुटून काढले..या बडबड गीतापर्यंत जाऊन ते वाक्यप्रचारा पर्यंत पोचतो ना राव..आहात कुटं.. कानामागून आली तिखट झाली, नाकाला मिरची झोंबणे..हा हा..बरं एवढ्यावर थांबेल का ही राणी..रेडिओ station ला हिचेच नाव.. रेडिओ मिरची..मिरची awards..हॉटेलांना पण हिचेच नांव..हे इतकं थोडं नव्हतं म्हणून की काय आता आईस्क्रीम मध्ये पण हिचाच झटक..हुश्श..बाईमीच याझटक्यानेकामकरेनाशी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30मिनीटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमहिरव्या मिरच्या
  2. 5-6 लिंबांचा रस आपल्या आवडीनुसार
  3. 1 टेबलस्पुनुन किसलेले आले
  4. 1 टेबलस्पूनधने
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. 1/4 टीस्पूनमेथी
  8. 1/4 टीस्पूनखडा हिंग
  9. 3/4 टीस्पूनहळद
  10. मीठ चवीनुसार
  11. फोडणीसाठी
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 1/2 टीस्पूनमोहरी
  14. 1/4 टीस्पूनहिंग
  15. 1/4 टीस्पूनमेथी
  16. 1/4 टीस्पूनमोहरी डाळ

कुकिंग सूचना

25-30मिनीटे
  1. 1

    प्रथम मिरच्या धुऊन पुसून घ्या मग त्यांचे हव्या त्या आकारात बारीक तुकडे करून घ्या. आता आल्याचे पण बारीक तुकडे करून घ्या किंवा किसून घ्या

  2. 2

    एका कढईमध्ये क्रमाने धणे,जीरे भाजून घ्या मोहरी पण 1-2मिनीटे भाजून घ्या..थोड्या तेलात मेथी,हिंग तळून घ्या..थंड झाल्यावर हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये थोडं भरडच फिरवून घ्या. हा झाला मसाला तयार.

  3. 3

    आता एका वाडग्यात चिरलेल्या मिरच्या किसलेले आले घ्या त्यावर वरील मसाला,हळद घालून मिश्रण एकजीव करा. आता मीठ घाला आणि मिश्रण परत एकजीव करा. नंतर यावर लिंबाचा रस टाकून नीट ढवळून घ्या.

  4. 4

    एका कढल्यात तेल मोहरी हिंग आणि मेथी यांची खमंग फोडणी करून द्या फोडणीत थोडी कोमट झाली की यामध्ये मोहरीची डाळ घाला आणि फोडणी गार झाली की मिरचीचा लोणच्यावर ओतून लोणचे छान ढवळून घ्या.

  5. 5

    आता हे लोणचे एका स्वच्छ काचेच्या बाटलीत भरून वरुन सुती कापड बांधून 2दिवस उन्हात ठेवा..झाले आपले चमचमीत मिरचीचे लोणचे तयार.‌

  6. 6

    तयार झालेले हे मिरचीचे लोणचो पोळी,भाकरी, भाताबरोबर तोंडी लावणे म्हणून सर्व्ह करा.

  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes