उपवासाचापौष्टिक, हेल्दी, टेस्टी चटपटीत मखाना (paushtik chatapati makahana recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#GA4
#week13
#मखाना
मखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतो. मधुमेहावर जर तुम्ही रोज चारच मखाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर डायबेटिस कमी होतो.मखान्याच्या निर्मिती करण्यासाठी कोणतेही रासायनिक खतं किंवा किटकनाशके वापरली जात नाही, त्यामूळे हे 'आँर्गेनिक फूड' आहे.

हा मखाना ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे, कारण हा भूक सुद्धा भागवतो आणि शरीरावर दुष्परिणाम सुद्धा करत नाही. त्यामुळे मखाना तुम्ही जास्त खाल्लं तरी काही नो टेन्शन! तुम्हालाही याचा आरोग्याला फायदा होतो हे माहित असेल.

प्राचीन काळापासून मखाना धार्मिक सणांच्या वेळेस उपवासाच्या दिवशी खातात. मखानापासून मिठाई, ,खीर, तिखट मिठाचे पदार्थ बनविले जातात. तर चला आज मखाना पासुन उपवासाचा पौष्टिक, हेल्दी, टेस्टी चटपटीत मखाना चिवडा बनवूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिट
३ मेंबर्स
  1. साहित्य :
  2. २०० ग्राम मखाना
  3. १ १/२ टेबलस्पून साजूक तूप
  4. 1 टीस्पून मिरे पूड
  5. शेंदे मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    कृती:
    एका जाड बुडाच्या कढईमधे १ टेबलस्पून तेल गरम करून त्यामध्ये मखाने घालून ७-८ मिनिट मंद विस्तवावर कुरकुरीत होईस्तोवर परतून घ्या.

  2. 2

    मग त्यामध्ये परत अर्धा टेबलस्पून तूप घालून मिक्स करून त्यात मिरे पावडर, शेंदे मीठ घालून फक्त १ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. नाहीतर मिरे पावडर करपून जाईल.

  3. 3

    तयार आहे उपवासाचा पौष्टिक, हेल्दी, टेस्टी चटपटीत मखाना चिवडा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes