चटपटीत सुरणाचे काप (suranache kaap recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

चटपटीत सुरणाचे काप (suranache kaap recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोसुरण (एलिफंट फूट यॅम)
  2. 2 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  3. 2 टीस्पूनमीठ
  4. 1 लिटरपाणी
  5. 2 टीस्पूनतिखट
  6. 2 टीस्पूनहळद
  7. 2 टीस्पूनधणे पूड
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 2 टीस्पूनचाट मसाला

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    सर्वप्रथम सुरण तीन ते चार पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावे. त्याचे साल काढून त्याचे चौकोनी काप करून घ्यावे.एकीकडे कुकर मध्ये पाणी तापायला ठेवावे.

  2. 2

    कुकर चे पाणी तापल्यावर त्यात मीठ व चिंचेचा कोळ ऍड करावे.सुरणाचे काप एका चाळणीत घ्यावे व ही चाळणी कुकर मध्ये ठेवावे. चाळणी कुकर मध्ये ठेवल्यानंतर कुकर चे झाकण लावून घ्यावे व दहा मिनिटे सुरण शिजू द्यावे. सुरण अशी शिजवावे जेणेकरून खूप मऊ पण नको आणि खूप कडक पण नको.

  3. 3

    एक नॉन स्टिक पॅन गॅसवर तापायला ठेवावे. त्यावर तेल घालावे व शिजलेले सुरणाचे काप एकेक करुन नॉनस्टीक पॅनवर ठेवावे. सुरणाच्या कापे वर तिखट हळद मीठ व धणे पूड भूरकवावी.

  4. 4

    दोन्ही बाजूने क्रिस्पी शिजवत दोन्ही बाजूने सर्व साहित्य सुरणाच्या कापावर घालावे. सुरण पूर्णपणे शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये सजवावे व त्यावरून भरपूर चाट मसाला घालावे. आपले चटपटीत सुरणाचे काप रेडी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes