कोबीचे पराठे (stuffed kobiche paratha recipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

#GA4
#week14
#keyword_cabbage
कोबीची भाजी विशेष कोणी घरी खात नसल्याने मी नेहमी असे पराठे बनविते... लगेच फस्त करतात 😀😀

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१५-२० मिन
३-४
  1. 2 वाट्याकोबी बारीक करून/खिसून
  2. 2 वाट्यागव्हाचे पीठ
  3. मीठ चवीनुसार
  4. 1/2 टीस्पूनसाखर
  5. 1/4 टीस्पूनआमचूर
  6. चिमुटभरगरम मसाला
  7. लाल तिखट आवडीनुसार
  8. कोथिंबीर
  9. 1-2 टीस्पूनदाण्याचा कुट
  10. 1/2 टीस्पूनधने पूड

कुकिंग सूचना

१५-२० मिन
  1. 1

    कोबी बारीक करून घ्यावी/खिसून घ्या

  2. 2

    कढ इत वरील कोबी घेऊन त्यात साखर, मीठ, गरम मसाला आणि लाल तिखट घालून मध्यम आचेवर कोरडा करून घ्या.

  3. 3

    थोडे थंड झाल्यावर त्यात आमचूर पावडर, दाण्याचा कुट आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.

  4. 4

    गव्हाचा पिठात मीठ आणि पाणी घालून पोळीसाठी भिजवितो तशी कणिक मळून घ्या

  5. 5

    एक मोठी पोळी लाटून त्याच्या अर्ध्या भागावर कोबीचे सारण भरावे आणि त्यावर राहिलेल्या पोळी ने बंद करून पराठा बनवा.

  6. 6

    तवा गरम करून त्यावर मध्यम आचेवर पराठे भाजून घ्यावे त आणि शेवटी उतरताना त्यावर आवडीप्रमाणे तेल/तूप/बटर लावून घ्यावे त्यामुळे पराठे खमंग लागतात. मस्त गरम गरम सर्व्ह करा सॉस किंवा दह्याबरोबर 😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
मस्तच खमंग दिसतोय पराठा 👌👍

यांनी लिहिलेले

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

Similar Recipes