दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#ब्रेकफास्ट #दडपे पोहे...आमचे कडे सहसा न होणारा प्रकार...पोहे म्हटले की, कांदापोहे, बटाटा पोहे असाच प्रकार असतो...पण या थीम मुळे आवर्जून आज दडपे पोहे केले. ओले खोबरे नसल्यामुळे, मी खोबरं किस कोरडाच वापरला आहे. म्हणून मग त्यात मी टोमॅटो टाकले, ओलसरपणा येण्यासाठी..बाकी मस्त , चविष्ट झालेत पोहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपपातळ पोहे
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. 1टोमॅटो बारीक चिरून
  4. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून
  5. 3 टेबलस्पूनबारीक खोबरं किस
  6. 1 टेबलस्पूनहिरवा वाटाणा
  7. 1लिंबाचा रस
  8. 2 टेबलस्पूनशेंगदाणे तडका देण्यासाठी
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  11. 1/4 टीस्पूनहळद
  12. 5-6कढीपत्ता पाने
  13. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  14. चिमुटभरहिंग
  15. चवीनुसारमीठ
  16. 1 टीस्पूनसाखर
  17. 2 टेबलस्पूनबारीक शेव

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    पोहे चाळून निवडून घ्यावे. कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. आता एका भांड्यात पोहे, कांदा, खोबरे किस, कोथिंबीर टाकावी. लिंबाचा रस टाकावा.

  2. 2

    टोमॅटो, वाटाणा टाकावा आणि चांगले मिक्स करून घ्यावे. 20-25 मिनिट झाकून बाजूला ठेवावे.

  3. 3

    25 मिनिटं झाल्यानंतर आता पोह्याला तडका द्यावयाचा आहे. त्यासाठी तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवावे. तेल टाकून नंतर त्यात जीरे मोहरी, तडतडल्यावर. शेंगदाणे, टाकावे. हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हिंग टाकून नंतर तयार तडका पोह्यात टाकून चांगले मिक्स करावे. त्यानंतर त्यात, मीठ, साखर, आणि शेव टाकावी.

  4. 4

    सर्व पुन्हा एकदा चांगले एकत्र करावे. दडपे पोहे खाण्यास एकदम तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes