कच्चे आलू व हिरवी मूग डाळ पिझ्झा (kachche aloo v hirvi moong dal pizza recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

#GA4
#week22
#Pizza
प्रोटीन युक्त विविध भाज्यांचा बनविलेला पिझ्झा जे मुलं भाज्या खात नाही त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे फास्ट फूडला हा एक चांगला पर्याय आहे

कच्चे आलू व हिरवी मूग डाळ पिझ्झा (kachche aloo v hirvi moong dal pizza recipe in marathi)

#GA4
#week22
#Pizza
प्रोटीन युक्त विविध भाज्यांचा बनविलेला पिझ्झा जे मुलं भाज्या खात नाही त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे फास्ट फूडला हा एक चांगला पर्याय आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिन.
४ व्यक्ती
  1. 1 (1/2 कप)हिरवी मुंग डाळ
  2. 2कच्चे आलू
  3. 1 इंचअद्रक चा तुकडा
  4. 1-2हिरवी मिरची
  5. 1सिमला मिरची
  6. 2-3फूलगोभी चे फुलं
  7. 1मोठा कांदा
  8. 1मोठ्या साईझचा गाजर
  9. 4 टेबलस्पूनकोथिंबीर किंवा पालक, मेथी
  10. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  11. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  13. 1/2 टीस्पूनखाण्याचा सोडा किंवा इनो
  14. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

३०मिन.
  1. 1

    हिरवी मूग डाळ दोन तास भिजत घाला. नंतर दोन-तीन पाण्याने धुऊन स्वच्छ करा. बटाट्याची छिलके काढून त्याचे तुकडे करा. आलू व मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या वाटताना त्यात दोन लसूण पाकळ्या घाला. न पाणी घालता बारीक पेस्ट तयार करा ह्यासाठी थांबून थांबून मिक्सर चालवा.वाटलेलं सारण मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढा.

  2. 2

    मोठा मिक्सिंग बॉल मध्ये किसलेले गाजर, बारीक चिरलेली फूलगोभी, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरचीचे तुकडे, हिरव्या मिरचीचे बारीक बारीक तुकडे कोथिंबीर आल्याचा तुकडा बारीक किसून घाला, व मीठ चवीनुसार घाला

  3. 3

    वरील तयार केलेले ब्याटर पाच मिनिट बाजूला ठेवा म्हणजे त्यात घातलेल्या भाज्या पाणी सोडतील, नंतर त्यातलं दोन मोठा चमचा(पळी) बॅटर घ्या व त्यात१/४ चमचा इनो किंवा खाण्याचा सोडा घाला. नंतर बॅटर व्यवस्थित ढवळून घ्या गरज वाटल्यास 2,3 टेबलस्पून पाणी घाला. नंतर मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवलेल्या नॉन स्टिक तव्याला थोड्या तूप किंवा तेलानी ग्रीसिंग करा

  4. 4

    नंतर ग्रीसिंग केलेल्या तव्यावर मध्यम आचेवर खाण्याचा सोडा घातलेल बॅटर दोन चामचे म्हनजे अर्ध, पातळ पसरावा त्यावर झाकण ठेवा तो फुलून वर येईल. नंतर त्यावर मोझरोला चीज घाला व पनीर किसून घाला दोन-तीन मिनिट छान शिजल्यानंतर, त्यावर बॅटर च दुसरं लेयर पसरवा व झाकण ठेवून भाजून घ्या. तो छान फुलून वर येईल नंतर त्याला परतवा व त्यावर परत थोडं तूप घाला व झाकण ठेवून दोन-तीन मिनिटं शिजू द्या. शिजला की नाही हे बघण्यासाठी त्यात चमचा खुपसून बघा जर त्याला बॅटर लागलं नाही तर तो शिजला असं समजा.

  5. 5

    दोन्ही साईड ने छान शिजल्यानंतर त्याला सोनेरी रंग येईल,त्यानंतर त्याचे पिझ्झा कटरणी तुकडे पाडा व सॉस सोबत किंवा ग्रीन चटणी सोबत सर करा

  6. 6

    एकदम स्वादिष्ट पौष्टिक व घरच्या घरी पिझ्झा तयार होईल व लहान मुलांना व मोठ्यांनाही खायला खूप मजा येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

टिप्पण्या

Similar Recipes