चीजी पेरी पेरी टोस्ट (cheese peri peri toast recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

#GA4
#week23
#toast
चीजी पेरी पेरी टोस्ट ही घरी बनवता येणारी ,अत्यंत कमी वेळात बनणारी स्ट्रीट फूड रेसिपी आहे. या रेसिपी मध्ये आपण पेरी पेरी मसाला व रेड गार्लीक चटनी बनवणार आहे.ही अत्यंत डिलिशियस रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी आहे

चीजी पेरी पेरी टोस्ट (cheese peri peri toast recipe in marathi)

#GA4
#week23
#toast
चीजी पेरी पेरी टोस्ट ही घरी बनवता येणारी ,अत्यंत कमी वेळात बनणारी स्ट्रीट फूड रेसिपी आहे. या रेसिपी मध्ये आपण पेरी पेरी मसाला व रेड गार्लीक चटनी बनवणार आहे.ही अत्यंत डिलिशियस रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिन.
४ व्यक्ती
  1. 8ब्रेड स्लाईसेस
  2. 100 ग्राममोसेरोला चीज
  3. 12-15लाल मिरची
  4. 8-9 लसून पाकळ्या
  5. 3शिमला मिरची
  6. 2कांदे
  7. 150 ग्रामपनीर
  8. 2-3हिरव्या मिरच्या
  9. 1 टीस्पूनजीरा पावडर
  10. 1 टीस्पूनकाळमीठ
  11. 3 टेबलस्पूनमेऑनीज
  12. 1/4 टीस्पूनकलमी पावडर
  13. 1 टेबलस्पूनओरेगानो
  14. 1 टीस्पूनपिठीसाखर
  15. 1 टीस्पूनलसूण पावडर
  16. 2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  17. 1/2 टीस्पूनकाळमीठ
  18. मीठ चवीनुसार
  19. पाणी

कुकिंग सूचना

३० मिन.
  1. 1

    रेड गार्लिक चटणी - लाल मिरच्या पंधरा ते वीस मिनिट पाण्यामध्ये भिजत घाला. त्यानंतर त्या पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला,त्यात 8,9 लसून पाकळ्या घाला, एक टिस्पून जिरा पावडर घाला, 1 टीस्पून काळ मीठ घाला. बारीक पेस्ट तयार करा

  2. 2

    पेरी पेरी स्पाइस मसाला_ एक चमचमीत,seasoning मसाला आहे.लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून,अर्धा टेबलस्पून काळमीठ,१/४ टिस्पून कलमी पावडर, १/२ टीस्पून मीठ, १ टीस्पून लसून पावडर 2 टीस्पून ओरेगानो, 1 टी स्पून व पिठीसाखर एक टीस्पून घालून सर्व व्यवस्थित मिसळा. कांदा बारीक चिरून घ्या शिमला मिरची बारीक चिरून घ्या पनीरचे बारीक तुकडे करा हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घ्या. आता मिक्सिंग वाटी मध्ये वरील सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळून घ्या

  3. 3

    त्यात दोन टेबलस्पून रेड गार्लिक चटणी घाला, दोन टेबलस्पून पेरी पेरी स्पाइस मसाला घाला, तीन टेबलस्पून मेयोनीस घाला व मोसेरोला चीज घाला. व सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.

  4. 4

    आता व्हाईट ब्रेडच्या स्लाईसेस घ्या व त्यावर बटर पसरवा व वरील तयार झालेला मसाला व्यवस्थित छान पसरवा

  5. 5

    टोस्टर प्री-हीट करा,टोस्टर नसेल तर तव्यावर हि हे टोस्ट करू शकता मी हे इलेक्ट्रिक टोस्टर मध्ये केले आहे. प्रिहिट टोस्टरमध्ये बटर घाला व तयार केलेले ब्रेड घाला.गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजा,बाहेर काढल्या नंतर लाल चटणी पसरवा,फार तिखट चमचमीत हवे असल्यास,त्यावर चीज किसून घाला व गरमागरम सर्व्ह करा. अत्यंत डिलिशियस चीसी पेरी पेरी टोस्ट सँडविच तयार होतील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

टिप्पण्या

Similar Recipes