बाजरीचे खमंग खुसखुशीत थालिपीठ (bajriche thalipeeth recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#GA4
#WEEK24
#Keyword_bajri

"बाजरीचे खमंग खुसखुशीत थालिपीठ"

बाजरी ही उष्ण आहे त्यामुळे थंडीमध्ये खाण्यासाठी चांगली असते.शिवाय अतिशय पौष्टिक ही आहे.. बाजरीची भाकरी पोटभरी साठी चांगली,कारण भाकरी खाल्ली तर लवकर भुक लागत नाही.. आणि बाळंतणीसाठी तर बाजरीची भाकरी अतिशय उपयुक्त..बाळासाठी दुध भरपूर प्रमाणात येते.बाजरीचे पीठ खमंग भाजून ठेवायचे आणि रोज सकाळी नाष्ट्याला पिठवणी (बुळग असही म्हणतात) बनवुन द्यायचे..त्यानेही बाळासाठी दुध भरपूर प्रमाणात येण्यासाठी मदत होते.... आमच्या गावाकडे तर दोन्ही टाईम बाजरीची भाकरीच खातात...दमदमीत असते..
तर अशा या बहुगुणी बाजरीची भाकरीच (थालिपीठ) पण त्यात कांदा कोथिंबीर मिरची लसूण घालून आणखी चविष्ट बनवली आहे.. चला तर मग रेसिपी बघुया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा, वीस मिनिटे
दोन
  1. 1 कपबाजरीचे पीठ
  2. 1/4 कपबेसन पीठ
  3. 3चार हिरव्या मिरच्या
  4. 5सहा लसुण पाकळ्या
  5. 2कांदे बारीक कापून
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. चिमुटभरहिंग
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 1 कपबारीक कापून कोथिंबीर
  10. चवीनुसारमीठ
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

पंधरा, वीस मिनिटे
  1. 1

    कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्यावी... कांदा कोथिंबीर बारीक कापून घ्यावी.. हिरवी मिरची, लसूण, जीरे मिक्सरमध्ये वाटून घ्यावे...

  2. 2

    बाजरीचे पीठ आणि बेसन पीठ चाळून घ्यावे..त्यात हळद, हिंग, मिरची लसूण जिऱ्याच वाटत, मीठ घालून चांगले मिक्स करावे.नंतर कांदा कोथिंबीर घालून घ्यावे.

  3. 3

    लागेल तसे पाणी घालत पीठाचा घट्ट गोळा मळून घ्यावा..पातळ नाही झाले पाहिजे,कारण थालिपीठ थापताना पाण्याचा हात घ्यावा लागतो...

  4. 4

    गॅस वर तवा तापत ठेवा आणि काॅटन चा रुमाल ओला करून पोळी पाटावर अंथरावा.. त्यावर पीठाचा छोटा गोळा घेऊन, हाताला पाणी लावून, हळूहळू हलक्या हाताने थालिपीठ थापावे..व तीळ भुरभुरावे..

  5. 5

    तीळ हाताने थोडे दाबून घ्यावे व बोटाने थालिपीठाला होल (छिद्र) पाडावेत..

  6. 6

    तव्यावर कांद्याने तेल फिरवून घ्यावे..व थालिपीठ तव्यावर टाकावे.. टाकताना रुमाला सकट उचलावे.वरची बाजु तव्यावर गेली पाहिजे.. अलगद रुमाल काढून घ्यावा..

  7. 7

    वरच्या बाजूला थोडे तीळ भुरभुरावे व हलक्या हाताने दाबून घ्यावे.. गॅस मिडीयम पेक्षा कमी असावा.. झाकण ठेवून एक मिनिट शिजू द्यावे..थालिपीठाच्या होल मधून चमच्याने तेल सोडावे..

  8. 8

    थालिपीठ पलटून घ्यावे व तेल सोडून झाकण ठेवून एक मिनिट शिजू द्यावे.. अशा पद्धतीने सगळे थालिपीठ खरपूस भाजून घ्यावे..

  9. 9

    तयार थालिपीठ टाॅमेटो साॅस,टाॅमेटो केचप किंवा दही सोबत सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes