मेथीचे पिठले (Methiche Pithale Recipe In Marathi)

मोडाची मेथी किंवा बारीक मेथी थंडीच्या दिवसात भरपूर मिळते आणि त्याचे बरेचशे प्रकारे करता येतात, पण गरम गरम भाकरी म्हटलं की त्याबरोबर पिठलं हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं.पिठलं खूप प्रकारे करता येतं. मेथीचे पिठलं तर सर्वोत्तम लागतं. गरमागरम भाकरी आणि गरमागरम पिठलं आणि तोंडी लावायला लिंबाचं लोणचं हे बरेच जणांचं आवडीचा रसायन असावं.
मेथीचे पिठले (Methiche Pithale Recipe In Marathi)
मोडाची मेथी किंवा बारीक मेथी थंडीच्या दिवसात भरपूर मिळते आणि त्याचे बरेचशे प्रकारे करता येतात, पण गरम गरम भाकरी म्हटलं की त्याबरोबर पिठलं हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं.पिठलं खूप प्रकारे करता येतं. मेथीचे पिठलं तर सर्वोत्तम लागतं. गरमागरम भाकरी आणि गरमागरम पिठलं आणि तोंडी लावायला लिंबाचं लोणचं हे बरेच जणांचं आवडीचा रसायन असावं.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मोडाच्या मेथीची मुळे कापून टाकून नंतर ती स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावी.
- 2
कढईत तेल टाकून लसुण तांबूस रंगावर परतून झाल्यावरती हिरव्या मिरच्या आणि कांदा ही तांबूस परतून घ्यावा व कापलेली मेथी घालून दोन मिनिट परतून घ्यावे.
- 3
दोन चमचे बेसनाचा पाण्यात घोळ बनवून ठेवावा आणि बेसनाचा घोळ कांद्यावरती घालून सतत ढवळत राहावे. बेसन लगेच आळंत येते व एक प्रकारची चमक येते तेव्हा समजावं की बेसन शिजलं आहे. एक मिनिट फक्त झाकून ठेवावे आणि नंतर गरम गरम भाकरीबरोबर सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालकाचे पिठले (Palak Pithale Recipe In Marathi)
#WWRथंडीत कुठलीही गोष्ट गरम गरम खाण्याची मजा काही औरच आणि सध्या पालेभाज्यांची भरपूर रेलचेल बाजारात दिसते त्यामुळे जेवण करतानाही खूप मजा येते. पिठलं ही गोष्ट गरमागरमच हवी! पालकाचे पिठले आणि मक्याची भाकरी, माझं खूप आवडतं जेवण. आता आपण बघूया झटपट तयार होणार पालकाचे लसून पिठलं. Anushri Pai -
मेथीचे बेसन (methiche besan recipe in marathi)
#GA4# Week 2 मधील थीम नुसार (Fenugreek) मेथीचे बेसन तयार करत आहे. बेसन करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात.विविध भाज्यांमध्ये बेसन टाकून भाज्या करता येतात.मी बारीक चिरलेली मेथी, कांदा आणि टमाटर यांचे पासून केलेले झटपट होणारे गरम-गरम बेसन तयार करत आहे गरम गरम बेसन खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
मेथीचे दह्यातील पिठले आणि कळण्याची भाकरी (methiche pithle and bhakri recipe in marathi)
#लंच#पिठले भाकरी# पहिली रेसिपीआमच्या घरी सर्वांची फेवरेट कळण्याची भाकर आणि मेथीचे पिठले आणि त्यावर लसणाचे तेल एकदम भन्नाट मेनू .थंडीच्या दिवसात हा मेनुची मजाच वेगळी. Rohini Deshkar -
मेथीचे पिठले(meethiche pithale recipe in marathi)
#cooksnap मी ज्योती गवाणकर आणि शीतल पाटील या मैत्रिणींची मेथीचे पिठले ही रेसिपी रीक्रीएट केली. मला पिठलं खूप आवडतं आणि मेथीची भाजी म्हणजे माझा जीव की प्राण, त्यामुळे ज्योती ताईंनी केलेली रेसिपी म्हणजे माझ्यासाठी सोने पे सुहागा अशीच होती.मला ती प्रचंड आवडली.मी अगदीच थोडा बदल त्यात केला. Preeti V. Salvi -
मेथीचे पिठलं -भाकरी (methichya pithla bhakhri recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#मेथीचे पिठलं -भाकरी रेसिपी#पोस्ट 2 Rupali Atre - deshpande -
पिठलं-भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)
#लंच1.सोमवार- पिठलं-भाकरीथंडीच्या दिवसात गरम गरम बाजरीची भाकरी आणि पिठलं, लसणाची चटणी, कांदा , गुळ बटाट्याची रस्सा भाजी ,जबरदस्त ..... Gital Haria -
मेथीचे आळण (Methiche Alan Recipe In Marathi)
#JLR#विदर्भात थंडीत आवर्जून केला जाणारा पदार्थ.करून बघा खुपच छान लागते .ज्वारीची भाकरी नी मेथीचे आळण. Hema Wane -
पिठलं (pithla recipe in marathi)
#ट्रेंडिंगपिठलं हे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवितात लसणाच पिठलं कांद्याचे पिठल्याचे असे अनेक प्रकार आहेत.पण पिठलं कसेही करा खूप छान लागतं भाजी नसेल तेव्हा पटकन होणारे आहे. भाकरी सोबत भातासोबत खायला खूप छान पर्याय आहेमी आज हाटलेले पिठल केल आहे.पिठलं भाकरी सोबत कांदा व मिरची आहाहा लज्जतच न्यारी😋 Sapna Sawaji -
मेथीच पिठलं (methich pithla recipe in marathi)
#GA4 # WEEK 19 मेथी हा किवर्ड घेऊन मी आज जेवायला केलंय गरमा गरम मेथीच पिठलं,गरम भात, सोबत लोणचं, मिरगुंड-कुरडई आणि मुळ्या चे काप... Sushama Potdar -
मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
#DR2थंडीच्या दिवसात पालेभाज्या भरपूर मिळतात त्यातीलच एक मेथीची भाजी. कवळी, सुंदर हिरवीगार अशी मेथीची भाजी दिसल्यावर साहजिकच बाजारातून आपण आवडीने ती घेऊन येतो आणि साधीशीच पण अतिशय ही चवदार अशी भाजी गरमागरम भाकरी बरोबर खूप सुंदर लागते. तर पाहूया मेथीची भाजी!!! Anushri Pai -
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
#EB1 #W1मेथी मुलत: उष्ण.. उत्तम कार्बोदके व लोहचे प्रमाण भरपूर असणारी.. मधुमेहिंसाठी जीवनामृत असणारी, हाडांसाठी, केसांच्या समस्यांसाठीही गुणकारी अशी सर्वगुण संपन्न मेथी. आपल्या आहारात असणे आवश्यकच.. त्यामुळे हिवाळ्यात मेथीचे वेगवेगळे पदार्थ करून खाणे, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तर बघूया! "मेथीचे पराठे" ही रेसिपी.. 🥰 Manisha Satish Dubal -
मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_कुकसॅन्प_चॅलेज#मेथीचे_आळण#Archana_Ingale यांची रेसिपी कुकसॅन्प केली. थोडासा बदल केला. म्हणजे मी नेहमी मेथीचे आळण करते, त्यात मी दही घालत नाही. व वरून तडका देत नाही. व पहिल्यांदाच दही व तडका देऊन ट्राय केले. आणि अतिशय चवदार आळण झाले.Thanks dear 🙏🏻 🌹 😊 तसेही मेथीचे आळण करायला सोपे पण तेवढेच चवीला स्वादिष्ट... केव्हाही करा त्याची चव उत्तमच लागते कमी साहित्य... जास्त तामछाम नसलेली रेसिपी...मेथीचे आळण करताना भाजीच्या येणाऱ्या सुगंधाने पोटामध्ये भूक जागृत झाल्याशिवाय राहात नाही.. म्हणजे माझ्याकडे तरी नेहमी असेच होते. सर्वांनाच खूप आवडतं *मेथीचे आळण*.. 💃 💃 Vasudha Gudhe -
झणझणीत पिठले (pithle recipe in marathi)
#GA4 #week12कोणत्याही घरात पिठले होत नाही असं मराठी घर सापडणं अशक्यच!स्वयंपाकघरातले कांदे,बटाटे,टोमॅटो आणि डाळीचे पीठ हे तर गृहमंत्रीच! आजचा कीवर्ड "बेसन" दिल्याबरोबर डोळ्यापुढे पिठलंच उभं राहिलं.खरंतर किती सोपी रेसिपी...पण प्रत्येकीच्या हाताची चव त्यात उतरतेच आणि मग चविष्ट असं पिठलं पानात आलं की ताव मारत जेवावंसं वाटतंच.नाही का?पिठल्याचे प्रकार तरी किती....!!साधं,वडीचं,तव्यावरचं घट्ट,झुणका,ताकातलं,गुठळ्यांचं उकळीचं,वाटल्या डाळीचं!!त्याबरोबर मग कांदा,लोणचं,ठेचा आला की जेवण लज्जतदार होणारच.😋एखाद्या प्रवासात न्यायला,खूप दमून उशीरा घरी आलं की,फ्रिजमधल्या भाज्या संपल्या की,अचानक एखादा जवळचा नातलग जेवायला हजर झाला की,कधीतरी चव बदल म्हणून,कधी जेवायला आपण एकटेच असलो तर...,सकाळी उठायला उशीर झाला की ऑफिसला टिफीनमध्ये,आणि कधीकधी तर चक्क ठरवूनही हे चमचमीत पिठलं गृहिणीला सांभाळतं.🤗हल्ली पिकनिकला अथवा एखाद्या रिसॉर्टला रहायला गेलं की किंवा एखादी दुर्गभ्रमंती या पिठलं-भाकरीशिवाय अपूर्ण रहाते.हायवे वर तर "पिठलंभाकरी तयार आहे"या पाट्या पर्यटकांना आकर्षित करतात.शाळेच्या गर्लगाईडच्या कँपला तर पिठल्यासाठी बेसनपीठ,कांदा हे आम्हाला न्यावंच लागे.......पण हेच पिठलं भात मात्र कुणी जवळंच गेल्यावर नेऊन द्यावं लागतं,तेव्हा अगदी बेचव लागतं आणि वाटतं... कोणी काढली असेल ही पिठलंभात देण्याची पद्धत!! असं हे सोप्पं पिठलं सुखदुःखात आपल्या साथीला असतं...कधी दुःखातून सावरायला तर कधी श्रमपरिहारार्थ!!मी केलेलं पिठलं तुम्हीही नक्की करुन पहा😊 Sushama Y. Kulkarni -
कुळीथाचं पिठलं (kulithache pithla recipe in marathi)
# EB11 #W11 गरमागरम वाफाळलेला भात, कुळीथाचं पिठलं सोबत एखादं लोणचं किंवा सांडगी मिरची.असं साधं जेवण.. पण मन त्रुप्त करणारं...... Sushama Potdar -
मेथीचे थालीपीठ (methiche thalipeeth recipe in marathi)
#cooksnapआज मी पल्लवी पायगुडे यांची मेथी थालीपीठ रेसिपी केली आहे. थालीपीठ असेही सर्वांना खूप आवडते, पोटभरीचे असते, त्यामध्ये मेथी घालून चव अजूनच छान आली. Thank you Pallavi Mam!!Pradnya Purandare
-
मेथीचे पराठे (मिक्स पिठे) (methiche paratha recipe in marathi)
#EB1 #W1#थंडी नी मेथीचे अतूट नाते आहे आपल्याकडे.थंडीत वेगवेगळे पदार्थ केले जातात कारण मेथी ही प्रकृतीस गरम असते म्हणून.चला आपण मिक्स पिठाचे ठेपले करूयात. Hema Wane -
टोमॅटोचे पिठले आणि भाकरी (tomatoche pithla ani bhakhri recipe in marathi)
#लंच #खास महाराष्ट्रीयन पदार्थ ! पोटात कावळे ओरडायला लागले, आणि समोर पिठलं-भाकरी असले, की काही विचारायलाच नको😋 कधी एकदा पिठलं भाकरी खातो असं होऊन जातं... असे हे पिठले आणि भाकरी, वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतात ...पण मी आज टोमॅटोचा पिठलं आणि ज्वारीच्या पिठाची भाकरी केलेली आहे... Varsha Ingole Bele -
सरसरीत पिठलं (pithale recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 मधली ९ वी रेसिपी आहे या आठवड्यात पावसाळी गंमत अशी थीम आहे. म्हणून मी गरमागरम सरसरीत पिठलं बनवले आणि पावसाळा म्हटलं की गरमागरम झणझणीत स्पायसी खायला पावसाळ्यात मजा येते. छान ज्वारी च्या भाकरी आणि हिरव्या मिरच्या चा ठेचा आणि सोबत च हाताने फोडलेला कांदा मिळाला की आहाहांं.....।।।।। चला तर बघुया💁 सरसरीत गरमागरम पिठलं नक्की करून बघा.....! Jyotshna Vishal Khadatkar -
कण्याचे पिठले (kanyache pithale recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #recipe1 गावाकडची रेसिपी.. कण्याचे पिठले चा मी पहिल्यांदा माझ्या सासरी आस्वाद घेतला .. आहा खूपच मस्त होते पिठले, अप्रतिम चव.. कण्याचे पिठले कधी हि ऐकून नव्हते .. कण्या म्हणजे काय माहिती नव्हते. आधी च्या काळी तुरी ची डाळ घरी करायचे, आणि करतांना जो भुरका (पावडर ) निघायचे तो म्हणजे कण्या .. त्याला नीट गाळून बेसन पीठ तयार करायचे आणि कैरी टाकून पिठलं करतात .. अप्रतिम चव ! Monal Bhoyar -
बारीक मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
या मेथीला समुद्री मेथी असेही म्हणतात. ही भाजी रुचकर तसेच पौष्टिक आहे. या भाजीमध्ये माती आणि रेती कोवळ्या मुळांमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे ही भाजी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आशा मानोजी -
मेथीचे पराठे (Methiche Parathe Recipe In Marathi)
#PRNझटपट होणारे आणि सगळ्यांच्या आवडीचे मेथीचे पराठे..लोणचं,चटणी सॉस,दही किंवा नुसत्या चहासोबत सुध्धा मस्त लागतात. Preeti V. Salvi -
कोलंबीचे सुके (Kolambiche Suke Recipe In Marathi)
कोलंबी ही मच्छी खायला सोपी त्यामुळे घरातल्या सगळ्यांना ती आवडते. जेवणाची लज्जत वाढते. आज आपण बघणार आहोत कोलंबीचे सुके, ज्याची चव आंबट तिखट अशी मस्त असते भाकरी किंवा भाताबरोबरही तोंडी लावण्यासाठी अतिशय सुंदर लागते Anushri Pai -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1गावरान झुणका हे नाव घेतल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटते. कुठल्याही प्रकारची गरमागरम भाकरी म्हटलं की झुणका त्या बरोबरीने आलाच. भाकरी आणि झुणका याची जोडी खूप पूर्वीपासून आहे. त्यात गावरान झुणका म्हणजे त्याला चुलीचा वास हवाच! पण आता घरोघरी चुली असणं शक्य नाही. म्हणून थोडाफार कोल स्मोक देऊन गावरान झुणका तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. Anushri Pai -
मेथीचे वरण (methiche varan recipe in marathi)
#GA4#week2#keyword_fenugreekमेथीचे वरण Shilpa Ravindra Kulkarni -
मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
#NVR मालवणात अशा प्रकारचे चिकन सुकं बनवलं जातं ते गरम गरम भाकरी बरोबर खूप छान लागतं . Purva Prasad Thosar -
मेथीचे रायते😋 (methiche rayte recipe in marathi)
आपण मेथीची भाजी किंवा बरेच रेसिपी करून पाहतो तर मी मेथीचे रायते करून पाहिले खुप छान आहे 👍 Vaishnavi Dodke -
मेथीचे थालीपीठ (methi thalipith recipe in marathi)
#GA4 #week7BreakfastPost 1बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीच्या भाजीचे फायदे अमुल्य आहेत. मेथी बहुगुणी आहे. थंडीच्या दिवसात ही भाजी खूप प्रमाणात मिळते. फ्रिजमध्ये थोडी मेथी शिल्लक होती. त्याची भाजी बनवली तर पुरण्यासारखी नव्हती म्हणून आज न्याहारी साठी मेथीचे थालीपीठ बनवण्याचे ठरवले😀. घरात सगळ्या प्रकारची पिठं होतीच. मेथीच्या थालीपीठा साठी साहित्य काय लागते ते बघुया😍. स्मिता जाधव -
पिठलं भाकरी (Pithla Bhakri Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्यात गरमागरम पिठलं भाकरी आणि ठेचाखाण्याची मजा काही औरच असते. आशा मानोजी -
मसूरी-डाळ फ़ाय (masoori daal fry recipe in marathi)
#लंच- रोजच्या आहारात नेहमी होणारी ,डाळ फ़ाय अनेक प्रकारे करता येते.आज मी कसूरी मेथी घालून केली आहे. Shital Patil -
बहुगुणी बारीक मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#msr#रानभाज्या रेसिपीज.भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.डाळ,पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येेतात.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.जाणून घेऊयात मेथीच्या सेवनाचे आरोग्यावर काय चांगले परिणाम होतात.बारीक मेथीची भाजी सुध्दा तितकीच बहुगुणी आहे.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
- बेसन पेरून कांदा पात भाजी (Besan Perun Kanda Paat Bhaji Recipe In Marathi)
- ओल्या लसूण पातीची चटणी (Olya Lasun Patichi Chutney Recipe In Marathi)
- सुरमई फ्राय,कोलंबीचा रस्सा (Surmai Fry Kolambi Rassa Recipe In Marathi)
- स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
- आलू पालक (Aloo Palak Recipe In Marathi)
टिप्पण्या