रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
२ लोक
  1. 250 ग्रॅम घट्ट दही
  2. २०-२५ लसूण पाकळ्या बारीक कापून
  3. 1 छोटाकांदा बारीक कापून
  4. १०-१२ कडिपत्ता
  5. 2हिरव्या मिरच्या बारीक कापून
  6. 1 टेबलस्पूनकोथींबीर बारीक कापून
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 2 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनधने पूड
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 1/2 टीस्पूनहिंग
  12. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  13. चवीनुसारमीठ
  14. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    गॅसवर तव्यात तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात जीरे घाला. जीरे तडतडले की त्यात बारीक कापलेली हिरवी मिरची आणि कडिपत्ता घालून परतून घ्या.

  2. 2

    त्यात बारीक कापलेला लसूण आणि कांदा घालून ५ मिनिटे कांदा गुलाबी होरेपर्यंत परतून घ्या. त्यात लाल तिखट, हिंग, हळद आणि धने पूड घालून एकजीव करा आणि ५ मिनिटे परतून घ्या.

  3. 3

    एका मोठ्या वाटीत घट्ट दही छान फेटून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या. त्यात तयार केलेली फोडणी घाला.

  4. 4

    फोडणी घातलेले दही छान एकजीव करून घ्या. आणि हे गरमागरम चपाती किंव्हा भाकरी सोबत वाढ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
ज्योती घनवट (Jyoti Ghanawat)
रोजी
नवी मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes