साबुदाणा बटाटा चकली(उपासाची) (sabudana batata chakli recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#उपासरेसिपी
उन्हाळ्यातला वाळवणाचा झटपट होणारा अजुन एक पदार्थ....साबुदाणा बटाटा चकली ...छान टेस्टी होते ..करुन बघा तुम्ही पण...

साबुदाणा बटाटा चकली(उपासाची) (sabudana batata chakli recipe in marathi)

#उपासरेसिपी
उन्हाळ्यातला वाळवणाचा झटपट होणारा अजुन एक पदार्थ....साबुदाणा बटाटा चकली ...छान टेस्टी होते ..करुन बघा तुम्ही पण...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोबटाटे
  2. 200 ग्रॅमसाबुदाणा
  3. 100 ग्रॅमभगर
  4. तिखट चविनुसार
  5. मीठ चविनुसार
  6. 2 चमचेजीरे
  7. 2 चमचेआमचुर पुड

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    प्रथम साबुदाणा चार तास भिजवुन घ्या.मग हा साबुदाणा मिक्सर मधुन जाडसर वाटुन घ्या.

  2. 2

    मग भगर फक्त आवश्यक तेवढे पाणि घालुन शिजवुन घ्या.बटाटे उकडुन घ्या.

  3. 3

    आता एका परातीत बटाटा किसुन घ्या.त्यात साबुदाणा,भगर घाला.मग तिखट,जीरे,मीठ,आमचुर पुड घालुन सगळे एकत्र करुन घ्या.

  4. 4

    मग चकलीच्या सोर्यात हे मिश्रण भरुन चकल्या करुन घ्या.या चकल्या एखाद्या प्लॅस्टीक शिट वर करा म्हणजे वाळल्यावर पटपट निघतील. या चकल्यांना छान कडकडीत उन्हात वाळवुन घ्या.

  5. 5

    आता या चकल्या वाळवुन तयार आहेत.मस्त एअरटाईट डब्यात भरुन ठेवा.छान टिकतात.मस्त लागेल डिप फ्राय करुन खा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes