फराळी भेळ (farali bhel recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

फराळी भेळ (farali bhel recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतयार साबुदाणा खिचडी
  2. 1/2 कपउपवासाची बटाटा भाजी
  3. 1/4 कपबटाटा शेव
  4. 1/4 कपबटाटा चिवडा
  5. 1/2 कपवेफर्सचे तुकडे
  6. 2 टेबलस्पूनमसाला शेंगदाणा
  7. 1/2 टीस्पूनलिंबू रस
  8. 1/2 टीस्पूनसाखर
  9. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  10. चवीनुसारमीठ
  11. कोथिंबीर

कुकिंग सूचना

15मिनिटे
  1. 1

    प्रथम तयार केलेली साबुदाणा खिचडी एका बाउल मध्ये घेणे. आता त्या मध्ये तयार केलेली उपवास बटाटा भाजी त्या मध्ये घालून घेणे.प्रमाण कमी जास्त करू शकता.

  2. 2

    आता दुसऱ्या बाउल मध्ये आपल्या आवडीनुसार बटाटा शेव, बटाटा चिवडा आणि वेफर्स चे तुकडे एकत्र करून घेणे.

  3. 3

    आता हे सगळे मिक्स उपवास पदार्थ खिचडीच्या बाउल मध्ये घालून घेणे. आता त्या मध्ये गरज असेल तर लाल तिखट, मीठ घालावे. व वरून लिंबू व साखर घालावी. वरून कोथिंबीर घालावी. व मसाला दाणे घालावेत.

  4. 4

    मस्त चटपटीत उपवासाची भेळ तयार झाली. झटपट हा पदार्थ उपवासला करू शकता.मस्त प्लेट मध्ये वरून थोडी शेव, मसाला दाणे आणि वेफर्स घालून भेळ सर्व्ह करावी.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes