"गुलाब केळी शिकरण" (gulab keli Śikaraṇ recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#cooksnap
#मुळ रेसिपी माझी मैत्रीण चारुशीला प्रभू हीची आहे..
Thank you dear ❤️
आज माझी 151वी रेसिपी आहे.
तसं शिकरण मी नेहमी बनवते पण गुलाब शिकरण हे नाव वाचून कुतूहलाने चारुची रेसिपी बघीतली आणि मनात निश्चय केला की या पद्धतीने करुन बघायचेय.. आणि खुप छान मस्तच झाले होते विक्रम...
झुक झुक झुक आगीणगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी,पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया, जाऊया..
मामाची बायको सुगरण,रोज रोज पोळी शिकरण..हे गाणे ऐकले की थोडं दुःख व्हायचं कारण दुर्दैवाने मला मामा नव्हता..पण मला एक मावशी होती. तिने कधीच मामाची उणीव भासू दिली नाही..
आम्ही गावी गेलो की मावशी नेहमी झाडावरचे केळाचे घड काढायची आणि दुध घरच्याच गायी,म्हैशीचे होते..मग काय भलं मोठं पातेले भरून शिकरणाचा बेत असायचा..पण केळी, दुध, वेलचीपूड घालून बनवायचो आम्ही..आज गुलाब घालून बनवले , खुप सुंदर चव येते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दोन तीन
  1. 4केळी
  2. 2 टेबलस्पूनसाखर
  3. 2 कपदुध
  4. 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  5. 1गुलाब, एक टीस्पून गुलाब पाणी
  6. 1 टीस्पूनहनी
  7. 1 टीस्पूनगुलकंद

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम केळी सोलून त्याचे काप करून घ्यावेत.. आम्हाला जरा बारीक केलेले आवडतात म्हणून बारीक काप केले आहेत.

  2. 2

    आवडीनुसार साखर घालून दुध गरम करून थंड केले.. वाटी मध्ये दुध घेऊन त्यात गुलाब पाकळ्या तोडून टाकावे, कापलेले केळीचे काप, वेलचीपूड, गुलकंद,हनी घालून सगळे मिक्स करावे आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे.

  3. 3

    तयार थंडगार शिकरण जेवताना चपाती सोबत किंवा जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणून सर्व्ह करावे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes