बेलड़ा पनाका | लिंबू सुंठ गुळ सरबत (limbu aala gud sharbat recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#jdr
पनाका ताज्या लिंबाच्या रसाने बनविलेले एक स्फूर्तिदायक पेय आहे आणि त्यात सहसा साखर घालून गोड बनवतात पण हे अस्सल थंड पेय गुळापासून बनविलेले आहे, साउथ इंडिया मध्ये बेलड़ा पनाका म्हणजे गुळाचे सरबत असे म्हणतात त्यापासून बनवलेले हे लिंबू आले सरबत आहे . गुळावर साखरे सारखे रासायनिक प्रक्रिया केली जात नाही त्यासाठी ते आपल्यासाठी अधिक चांगले आहे.
उष्णतेवर मात करण्यासाठी निश्चितच ह्या सरबताची मदत होते. तसेच हे हेल्दी पेय आहे आणि खनिजांनी समृद्ध आहे.
साउथ इंडिया मध्ये रामनवमी उत्सवासाठी बेलडा पनाका बनवले जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपथंड पाणी
  2. 4 चमचेगुळ
  3. 1/4 चमचावेलची पावडर
  4. 1 चिमूटभरकाळी मिरी पावडर
  5. 1 चिमूटभरकेशर
  6. 1/4 चमचासुंठ पावडर
  7. 1 लिंबाचा रस

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्यावे.

  2. 2

    मोठ्या भांड्यात थंड पाणी घ्या.
    पाण्यामध्ये काळी मिरी पावडर, वेलची पावडर, केशर आणि सुंठ पावडर पावडर शिंपडा

  3. 3

    नंतर गूळ घालून मिक्स करावे

  4. 4

    गूळ विरघळला की लिंबाचा रस पिळून घ्यावा
    सर्व्ह करण्यापूर्वी आणखी काही काळ थंड करा.

  5. 5

    थंडगार बेलड़ा पनाका म्हणजेच लिंबू सुंठ गुळ सरबत तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes