सात्विक आरोग्यवर्धक आवळा सूप (awla soup recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#hs
#आंवळा
#soup
#Aawla
आपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की, हे एकमेव असे फळ आहे की, जे शिजवल्यानंतर किंवा सुकवल्यानंतर ही त्यात असलेल्या व्हिटॅमिन सी चा नाश होत नाही. यामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए आणि तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे समृद्ध खनिजे असतात.
प्रत्येक वेळी हवामान फेर बदल झाल्यास फ्लू, सर्दी आणि खोकल्या सारख्या समस्या उद्भवू लागतात. आवळा सूप प्यायल्याने सर्दी, खोकला आणि हंगामी ताप यासारख्या समस्यांना रोखता येते आणि लवकर आराम मिळतो.
मोरावळा, पेठा, सुपारी, लोणचे, सरबत,सूप
प्रवासातला महत्त्वाचा सोबती. आवळा सुपारी व पेठा सर्वांनाच परिचित आहे. आयुर्वेदात याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. उदा. पित्तशामक, केशवर्धक, शक्तिवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते.
आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.
आवळ्यापासून सूप तयार केले या सुपाला घट्टपणा येण्यासाठी हिरव्या टोमॅटोचा ही वापर केला आहे ज्यामुळे आवळ्याचा तुरटपणा टोमॅटोचा आंबटपणा आणि काही मसाले टाकून स्वादिष्ट असे सूप तयार केले
एकदा नक्की ट्राय करून हे सूप आहारातून घेऊन बघा नक्कीच आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीट
3व्यक्ती
  1. 5आवळे
  2. 3हिरवे टोमॅटो
  3. 1/2 इंचआल्याचा तुकडा
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 6-7कढीपत्त्याची पाने
  6. 2 टेबलस्पूनकोथंबीर
  7. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  8. 1/2 टेबलस्पूनजीरे
  9. 2 टेबल्स्पूनगुळ
  10. मीठ चवीनुसार
  11. 1/2 टेबलस्पूनलाल मीठ
  12. 1/2 टेबलस्पूनकाळीमिरी पावडर
  13. 1/4 टीस्पूनदालचिनी पावडर

कुकिंग सूचना

30 मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम सूप साठी लागणारे साहित्य तयार करून घेऊ
    आता एका पॉट मध्ये टोमॅटो कट करून हिरव्या मिरची कट करून कढीपत्त्याची पाने कोथिंबीर आणि आवळा आखा टाकून पाणी टाकून घेऊ

  2. 2

    कुकरमध्ये पॉट ठेवून 3/4 शिट्ट्या घेऊन शिजवून घेऊन

  3. 3

    आवळे टोमॅटो शिजल्यानंतर थंड करून घेउ आवळे हाताने कुस्करून आतल्या बिया काढून आवळा वेगळा करून घेऊ

  4. 4

    आता शिजलेला आवळा,टोमॅटो मिक्सर पॉट मध्ये टाकून बारीक पेस्ट तयार करून घेऊ

  5. 5

    पिसलेली बारीक पेस्ट बाजूला काढलेल्या पाण्यात टाकून मिक्स करून घेऊ
    पाणी आणि पेस्ट चमच्याने मिक्स करून घेऊ
    आता फोडणीची तयारी करून घेऊ

  6. 6

    एका पातेल्यात तूप टाकून जीरे तडतडल्यावर
    तयार सुप टाकून घेऊ
    दिल्याप्रमाणे मसाले टाकून घेऊ

  7. 7

    थोडी उकळी आल्यावर काळी मिरी दालचिनी पावडर टाकून उकळून घेऊ

  8. 8

    एक उकळी आल्यावर गॅस बंद करून सुप सर्व करून घेऊ. सुप टेस्ट करून बघायचा थोडा चवीनुसार मसाले अजून टाकू शकतो

  9. 9

    तांदळाच्या पापड्या बरोबर सूप सर्व केले

  10. 10

    एकदम आरोग्यवर्धक असे आवळ्याचे सूप नक्की सेवन केले पाहिजे

  11. 11
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes