पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#cr
#पुरी भाजी

पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi)

#cr
#पुरी भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 1 कपतेल
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 5-6 कडीपत्त्याची पाने
  6. 1बारीक चिरलेला कांदा
  7. 2बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. चवीनुसारमीठ
  10. कोथिंबीर गार्निश करण्यासाठी
  11. पुऱ्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  12. 1 कपकणिक
  13. 1/4 कपबारीक चिरलेली पुदिन्याची पाने
  14. 1/2 टीस्पूनजीरे
  15. 2बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  16. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  17. 1/2 टीस्पूनसाखर
  18. 1 टीस्पूनतेल
  19. चवीनुसारमीठ
  20. थोडे पाणी
  21. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    उकडलेल्या बटाट्याची साल काढून त्याचे छोटे-छोटे तुकडे करून घ्यावे. एका मोठ्या कढईमध्ये तेल घालून तेल तापायला ठेवावे.

  2. 2

    तेल तापल्यावर त्यात मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी द्यावी.

  3. 3

    आता त्यात कांदा घालून तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. आता त्यात हिरव्या मिरच्या टाकावे.

  4. 4

    आता त्यात हळद घालून सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे. आता त्यात बटाट्याच्या फोडी टाकाव्यात.

  5. 5

    शेवटी चवीनुसार मीठ घालून बटाट्याची भाजी परत एकदा मिक्स करून घ्यावी. बटाट्याची भाजी तयार आहे.

  6. 6

    आता आपण पुऱ्या तयार करून घेऊ. त्यासाठी एका भांड्यात कणिक घेऊन त्यात पुदिन्याची पाने, जीरे, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, साखर, तेल आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

  7. 7

    आता त्यात थोडेसे पाणी घालून कणिक मळून घ्यावी आणि घट्ट गोळा बनवून घ्यावा.

  8. 8

    छोटे-छोटे गोळे बनवून त्याच्या सर्व पुऱ्या लाटून घ्याव्यात.

  9. 9

    कढईमध्ये तेल मांडून तेल तापल्यावर सर्व पुऱ्या तळून घ्यावेत.

  10. 10

    सर्व्हिंग प्लेटमध्ये पुऱ्या आणि बटाट्याची भाजी घेऊन भाजी कोथिंबीरने गार्निश करावी. रेडी आहे पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes