सातारचा कंदी पेढा (kandi peda recipe in marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.त्यांनी सत्तर वर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहचला.
आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई  मात्र  कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो.
म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे. तर चला आपण पाहू कंदी पेंढ्याची रेसिपी
#पश्चिम महाराष्ट्र
#KS2

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
१० जणांसाठी
  1. 1 लिटरदुध
  2. 8-10 पाकळ्या वेलची
  3. 1/2 वाटीसाखर
  4. गरजेनुसार तूप / मला पाव चमचा लागला
  5. ७-८केसर

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    प्रथम एका नॉनस्टिक कढई मध्ये 1 लिटर दुध ओतले व गॅस चालू केला. ५ मिनिटांनी साखर दुधात ऍड केली. व मध्यम आचेवर १५ मिनिटे चांगलं ढवळून घेतले.

  2. 2

    पुन्हा गॅस १५ मिनिट फास्ट ठेवून ढवळून घेतले.

  3. 3

    मग गॅस मध्यम केला जस जसे दूध आटले तस तस चमचा च्या साह्याने दूध ढवळत राहिले. बरोबर दिढ तास लागले दूध आटवायला.

  4. 4

    पूर्ण दूध आटल्यावर त्यात वेलची व केसर ऍड करून मिश्रण चांगले ढवळून घेतले व २० मिनिट झाकून ठेवले. जस मिश्रण थंड झाल्यावर एका ताटात सर्व मिश्रण काढले व हाताला तूप लावून कंदी पेढे करून घेतले.

  5. 5

    अश्या प्रकारे साताऱ्याचे कंदी पेढे तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

टिप्पण्या

Similar Recipes