एग भुर्जी पाव (egg bhurji pav recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#pe
"एग बुर्जी " पटकन होणारी रेसिपी. टिफिनसाठीही उत्तम नॉनव्हेज रेसिपी. मुंबईत तर स्ट्रीट फूड म्हणून "भुर्जी पाव " लोकप्रिय डिश. तर बघूया ही अगदी सोप्पी रेसिपी 🥰

एग भुर्जी पाव (egg bhurji pav recipe in marathi)

#pe
"एग बुर्जी " पटकन होणारी रेसिपी. टिफिनसाठीही उत्तम नॉनव्हेज रेसिपी. मुंबईत तर स्ट्रीट फूड म्हणून "भुर्जी पाव " लोकप्रिय डिश. तर बघूया ही अगदी सोप्पी रेसिपी 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 minite
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 4एग
  2. 2कांदे
  3. 2 लहानटोमॅटो
  4. 4बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  5. 1 टीस्पून लाल तिखट
  6. 1 टीस्पून गरम मसाला पावडर (कोणत्याही ब्रँडचा)
  7. 1/2 टीस्पून हळद, मूठभर चिरलेली कोथम्बीर, मीठ, तेल

कुकिंग सूचना

15 minite
  1. 1

    प्रथम कांदे, टोमॅटो, मिरच्या बारीक चिरून घ्यावेत. पॅन मध्ये 4 tbs तेल गरम करून मिरच्या घालाव्यात. त्यानंतर कांदा परतावा, तेलात कांदा छान भाजला की, टोमॅटो परतावा. थोडे मीठ घालून एक वाफ आणावी.

  2. 2

    एक वाफ आणल्यावर, त्यात लाल तिखट, गरम मसाला, हळद घालून परतावे, त्यानंतर अंडी फोडून घालावीत व सर्व व्यवस्थित मिक्स करावे. चवीनुसार मीठ घालून झाकण झाकून एक वाफ आणावी.

  3. 3

    तयार गरमागरम "एग बुर्जी" वर चिरलेली कोथम्बीर पेरून पावाबरोबर सर्व्ह करावी. किंवा चपाती, भाकरीबरोबरही सर्व्ह करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

Similar Recipes