आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)

Kamat Gokhale Foodz
Kamat Gokhale Foodz @KGF11

#KS8

स्ट्रीट फूड थीम साठी आजची रेसिपी आहे आलू चना चाट. चणे खूपच पौष्टिक असतात ते आपल्या रोजच्या खाण्यात वरचेवर वापरणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण मग ते जरा असे चटपटीत बनवून खाल्ले तर😀.

आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)

#KS8

स्ट्रीट फूड थीम साठी आजची रेसिपी आहे आलू चना चाट. चणे खूपच पौष्टिक असतात ते आपल्या रोजच्या खाण्यात वरचेवर वापरणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण मग ते जरा असे चटपटीत बनवून खाल्ले तर😀.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ -२० मिनिटे
२ लोक
  1. 5-6तास भिजवून शिजवलेले 1 आणि १/२ कप चणे
  2. 2 चमचेतेल
  3. 1उकडलेला बटाटा
  4. 1कांदा
  5. 1टोमॅटो
  6. 1 चमचालाल तिखट
  7. 1/2 चमचाहळद
  8. 1/2 चमचाधणे पावडर
  9. 1/2 चमचाआमचूर पावडर
  10. 1/2 चमचाचाट मसाला
  11. थोडी कोथिंबीर
  12. 1/2 कपदही
  13. मीठ चवीनुसार
  14. बारीक शेव सर्व्हिंग साठी
  15. हिरवी चटणी आणि गोड चटणी साहित्य
  16. 2हिरव्या मिरच्या
  17. 1/2 कपचिरलेली कोथिंबीर
  18. ८-१० पुदिना पाने
  19. 1 चमचाचाट मसाला
  20. 1/2 चमचाजीरे
  21. 1 चमचालिंबू रस
  22. 1 चमचापंढरपुरी डाळ (ऑप्शनल)
  23. 4 चमचेगूळ
  24. लिंबा एवढा चिंच गोळा
  25. 1 चमचालाल तिखट
  26. मीठ चवीनुसार
  27. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

१५ -२० मिनिटे
  1. 1

    प्रथम हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर,पुदिना,हिरवी मिरची,चाट मसाला,जीरे,पंढरपुरी डाळ,मीठ आणि लिंबू रस हे सगळे एकत्र वाटून घ्या. वाटताना लागेल तसे म्हणजे किती पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला. यामध्ये मी डाळ वापरली आहे त्याने चटणीला घट्टपणा यायला मदत होते. ऑप्शनल आहे.

  2. 2

    गोड चटणी बनवण्यासाठी दिड कप पाण्यामध्ये चिंच,गूळ एकत्र उकळून घ्या.मिश्रण घट्ट होत आले की त्यात तिखट,मीठ,चाट मसाला घाला. नंतर हे गाळून एका बाउल मध्ये काढा.ही चिंचेची गोड चटणी तयार होईल. यात पाण्याचा वापर चटणी किती घट्ट हवी त्यानुसार प्रत्यक्ष पाहून करावा.

  3. 3

    आता गॅसवर एका कढई मध्ये २ चमचे तेल गरम करावे. इथे तेलाऐवजी बटर किंवा तूप वापरू शकता. त्यात शिजवलेले चणे घाला. हे तेलावर ४-५ मिनिटे परतून घ्यायचे आहेत. आणि गॅस बंद करा.चणे घेताना त्यातले शिजलेले पाणी आधीच गाळून घ्यावे. आता या चण्यामधे तिखट,मीठ,हळद,चाट मसाला,धने पावडर,आमचूर पावडर हे सगळे घाला आणि मिक्स करा.

  4. 4

    आता हे चणे पळीनेच जरा हलकेच प्रेस करा.आणि एका भांड्यात काढून घ्या. त्यात उकडलेला बटाटा हातानेच जरा कुसकरून (म्हणजे मोठ्या फोडी राहतील असाच)घाला.तसेच त्यात चिरलेला कांदा,टोमॅटो,कोथिंबीर घाला.मग त्यात हिरवी चटणी,गोड चटणी घालून मिक्स करून घ्या.

  5. 5

    आता त्यात दही घालून मिक्स करा,आणि सर्व्हिंग साठी एका प्लेट मध्ये घ्या. त्यावर पुन्हा आवडीनुसार दही,गोड आणि हिरवी चटणी आणि बारीक शेव घालून खायला घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kamat Gokhale Foodz
रोजी
YOU TUBE - Kamat Gokhale Foodz
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes