स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (street style mumbai tawa pulav recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#KS8
#स्ट्रीट फूड रेसिपीज

मुंबईतील स्ट्रीट फूड पैकी , मुंबई तवा पुलाव खूपच प्रसिद्ध आहे.
मोठ्या लोखंडी तव्यामधे हा पुलाव भरपूर प्रमाणात बनवला जातो.
हा पुलाव आपणही घरच्याघरी अगदी सहज बनवू शकतो .
पाहूयात रेसिपी.

स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (street style mumbai tawa pulav recipe in marathi)

#KS8
#स्ट्रीट फूड रेसिपीज

मुंबईतील स्ट्रीट फूड पैकी , मुंबई तवा पुलाव खूपच प्रसिद्ध आहे.
मोठ्या लोखंडी तव्यामधे हा पुलाव भरपूर प्रमाणात बनवला जातो.
हा पुलाव आपणही घरच्याघरी अगदी सहज बनवू शकतो .
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मि.
३ सर्व्हिंग्ज
  1. 2 कपशिजवलेला बासमती राईस
  2. 1/2 कपउकडलेले मटार
  3. 1उभा कांदा चिरलेला
  4. 1टोमॅटो बारीक चिरून
  5. 1/2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  6. 1/2 कपबारीक चिरलेली सिमला मिरची
  7. 1 टीस्पूनधणेपूड
  8. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  9. आलं‌ लसूण पेस्ट
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  12. मीठ चवीनुसार
  13. 1/4 कपकाजू
  14. 1हिरवी बारीक चिरून
  15. तेल फोडणी करीता
  16. कोथिंबीर
  17. 1 टेबलस्पूनबटर
  18. 1 टेबलस्पूनलाल मिरची पेस्ट
  19. लिंबाचा रस

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    लोखंडी तवा गरम करून (मला जास्त प्रमाणात करायचा होता म्हणून मी मोठे पातेले वापरले.) त्यात बटर,तेल गरम करून त्यात आलं‌ लसूण पेस्ट,हिरवी मिरची,कांदा घालून छान लालसर होईपर्यंत परतून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात टोमॅटो,सिमला मिरची,काजू,लिंबाचा रस घालून छान परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात वरील मसाले,मटार घालून छान परतून घ्या.

  4. 4

    नंतर त्यात शिजवलेला भात,मीठ घालून छान मिक्स करून १० मि.भात वाफवून घ्या.

  5. 5

    तवा पुलाव रायत्यासोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes