ऑइल फ्री ब्रोकोली-फ्लॅक्ससीड गलौटी कबाब (broccoli flaxseeds galouti kabab recipe in marathi)

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
वसई / महाराष्ट्र

#asahikasaiindia
#No_oil_recipe

" ऑइल फ्री ब्रोकोली-फ्लॅक्ससीड गलौटी कबाब "

ऑइल फ्री थीम ,आणि त्याला साजेशी रेसिपी करायची तर ती पौष्टिक असायलाच हवी नाही का, आणि ब्रोकोली पेक्षा पौष्टिक ते काय...!!
#ब्रोकोलीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वं आणि पोषणमुल्यं असतात. ज्यामुळे पौष्टिक आहारात या भाजीचा समावेश केला जातो. एका ब्रोकोलीत जवळजवळ 53 कॅलेरिज आणि 4 ग्रॅम प्रोटिन्सची मात्रा असते. ब्रोकोली विविध पद्धतीने खाल्ली जाते. तुम्ही सॅलेडप्रमाणेच पराठा, सूप, स्मुदी, कटलेट आणि सॅन्डविजमध्ये ब्रोकोलीचा वापर करू शकता...अनेक आरोग्यवर्धक तसेच सौंदर्य वर्धक गुणांनी भरलेली अशी ही ब्रोकोली म्हणजे एक वरदान म्हणता येईल.
तसेच#जवस बिया आवश्यक पोषक तत्त्वांचे छोटे खजिनाच आहेत. त्यामधील ओमेगा ३ फेटी एसिड्सचे प्रमाण इतर धान्यापेक्षा अधिक आहे..
एकंदरीत ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, त्यांनी जवस आणि ब्रोकोली यांचा आहारात समावेश करावा..
चला तर मग आपली रेसिपी पाहूया...👌👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामब्रोकोली
  2. 150 ग्रामपनीर
  3. 1 छोटाबटाटा उकडून,(बायंडिंग साठी)
  4. 1 टेबलस्पूनजवस
  5. 1/2 टीस्पूनओवा
  6. 1 टीस्पूनमिरची पेस्ट
  7. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनकालिमिरी पूड
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. चवीनुसारमीठ
  12. अर्ध्या लिंबाचा रस

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    पनीर, ब्रोकोली आणि बटाटा किसून घ्या

  2. 2

    त्या नंतर त्यात येऊ एक एक करून सगळे जिन्नस घालून घ्या, जवस, ओवा

  3. 3

    काळीमिरी पूड, मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट

  4. 4

    बारीक चिरलेली कोथिंबीर लाल तिखट लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करा

  5. 5

    बाईंड होतंय का ते बघा, आणि छोटे छोटे कटलेट बनवून घ्या
    (बाईंडिंग साठी यात कॉर्न फ्लोर किंवा ब्रेड क्रंम घालू शकता)

  6. 6

    आता तयार कटलेट अर्धा तास फ्रीझ मध्ये सेट व्हायला ठेवा

  7. 7

    आणि एक नॉनस्टिक पॅन गरम करून त्यात एक एक करून कटलेट ठेवून द्या
    दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या, तेल लावायची अजिबात गरज नाही, हे एअरफ्रायर मध्ये पण भाजून घेऊ शकता

  8. 8

    आपले एकदम पौष्टिक असे,
    "ऑइल फ्री ब्रोकोली-फ्लॅक्ससीड गलौटी कबाब" तयार आहेत...👌👌
    गरमगरम कबाब भारी लागतात, आणि पौष्टीक पण आहेत...👍👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
रोजी
वसई / महाराष्ट्र
Hello friends, I'm shital raut ,I'm a nursing professional but extremely passionate about food and cooking ,i love to celebrate each and every day with life And good lifestyle...!!i love to faces multiple tasks...!!So here imSo let's get started...😊follow me for recipe videos on Instagram@brunch4appetite#Amother#youtuber#homechef #instagrammer
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes