अळूची भाजी (aluchi bhaji recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#msr
चिंच गूळ घालून केलेली अळूची भाजी भात आणि तूप अहाहा खूप मस्त लागते अगदी लहानपणाची आठवण येते माझ्या आजीनी केलेली ही भाजी मला फारच आवडते त्या पाककृती मी केली आहे.

अळूची भाजी (aluchi bhaji recipe in marathi)

#msr
चिंच गूळ घालून केलेली अळूची भाजी भात आणि तूप अहाहा खूप मस्त लागते अगदी लहानपणाची आठवण येते माझ्या आजीनी केलेली ही भाजी मला फारच आवडते त्या पाककृती मी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 8-10अळूची पाने
  2. 1 टेबलस्पूनहरभरा डाळ
  3. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  4. 3-4 टेबलस्पूनबेसन
  5. चवीनुसारमीठ
  6. 1 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  7. 1 टेबलस्पूनगूळ
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 1/2 टीस्पूनमोहरी
  10. 4-5मेथी दाणे
  11. 1/8 टीस्पूनहिंग
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 4-5कडीपत्ता पाने
  14. 2-3लसूण पाकळ्या
  15. 1/2 कपचिरलेला कांदा
  16. 1सुकी लाल मिरची
  17. 2 टेबलस्पूनगोडा मसाला
  18. 1 टीस्पूनतिखट
  19. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    हरभरा डाळ आणि शेंगदाणे कुकरच्या भांड्यात काढून धुवून ठेवावे.अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या. देठं काढून सोलून घ्या आणि भाजी बरोबर देठंही चिरून घ्या.

  2. 2

    आता कुकरच्या भांड्यात चिरलेली भाजी घालून थोडे पाणी घालून शिजवून घ्या.कांदा लसूण चिरून घ्या.कुकरमध्ये भाजी शिजून गार झाल्यावर त्यात बेसन पीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे.

  3. 3

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी मेथी हिंग हळद कडीपत्ता मिरची कांदा लसूण घालून परतावे त्यात भाजी घाला आणि मिक्स करावे. आता यात गोडा मसाला मीठ तिखट चिंचेचा कोळ गूळ घालून 5-7 मिनिटे झाकण ठेवून उकळून घ्यावे तयार भाजी पोळीबरोबर भाताबरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes