मोड आलेल्या मुगाची उसळ (mood alelya moongachi usal recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#kdr प्रथिनांचा स्रोत म्हणून कडधान्ये खाल्ली पाहिजेत. परंतु मूग हे कडधान्य काही विशेष गुणधर्मांनी युक्त आहे. ज्वर, स्थूलता, मधुमेह, अग्निमंद्य या सारख्या आजारांवर मूग सेवन अतंत्य फायदेशीर आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी देखील मुग आणि मुगाचे पदार्थ उपयुक्त आहेत. मुगाचे सेवन करण्यापूर्वी विविध प्रक्रिया करून त्यातील पौष्टिकता वाढवता येऊन लवकर प्रक्रियाशील बनवता येतात. भिजवणे, मोड आणणे, भाजणे, शिजवणे या सारख्या प्रक्रिया करून मूग खाण्यास सोयीस्कर करता येतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ व्यक्तींसाठी
  1. कडधान्य
  2. 1 वाटीमोड आलेले मूग (मोड कसे आणावे त्यासाठी सोबत ची लिंक पहा)
  3. 1 वाटीमक्याचे दाणे (ऐच्छिक)
  4. वाटणासाठी ओला मसाला
  5. 2आगीवर भाजलेले कांदे
  6. 1टोमॅटो
  7. 3हिरव्या तिखट मिरच्या
  8. 4-5लसूण पाकळ्या
  9. 1 वाटीकोथिंबीर
  10. 4-5पुदिना पाने
  11. 1 इंचआलं
  12. 4-5कढीपत्ता पाने
  13. खडे मसाले
  14. 4 चमचेसुकं किसलेलं खोबरं
  15. 3-4लवंगा
  16. 1काडी जावित्री
  17. 1चक्री दगडफूल
  18. 2तिरफळं
  19. 3-4अख्खी काळीमिरी
  20. 1/4 चमचाशहाजिरे
  21. 1/4 चमचासाधे जीरे
  22. 1 इंचदगडफूल (lichen)
  23. 1/2 इंचदालचिनी
  24. 1/2 चमचाबडीशेप
  25. 2लाल सुक्या / बेडगी मिरच्या
  26. 1/2 चमचापांढरे तीळ
  27. 1/4 चमचाखसखस
  28. मसाले पावडर
  29. 1/4 चमचाहळद
  30. 1 चमचालाल तिखट मसाला
  31. 1/4 चमचाकला मसाला
  32. 1/4 चमचागोडा मसाला
  33. 1/4 चमचाकाश्मिरी लाल पावडर (रंगासाठी)
  34. 1 चमचाधणे पावडर
  35. 1 चमचाजीरे पावडर
  36. 1/4 चमचागरम मसाला
  37. ईतर साहित्य
  38. चवीनुसारमीठ
  39. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    माझ्या मटकीची भाजी च्या पाककृती साठी पहिली स्टेप मोड आणण्यासाठी जी दिली आहे तीच मी नेहमी ट्रिक use करते.
    मटकी सोबत मी मक्याचे दाणे सुद्धा वापरले आहेत.

  2. 2

    कांदा, टोमॅटो, मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना बारीक चिरून घेतलं. सर्व ओले आणि खडे मसाले कढईत गरम तेलावर परतून घेतले.

  3. 3

    थंड झाल्यावर मिक्सर ला थोडं पाणी आणि मीठ घालून वाटण करून घेतलं. कढईत तेल गरम करून त्यावर मसाले पावडर एक एक घालत कमी आचेवर परतून घेतले. त्यात वाटण घालून आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून एक उकळी काढली. मग त्यात मोड आलेले मूग आणि मक्याचे दाणे घातले. कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून मूग शिजवत ठेवलं. मूग बोटांनी दाबता येतील इतपत शिजले कि गॅस बंद करून कोथिंबीर भुरभुरावी. वाफाळत्या भातासोबत खायला मुगाची उसळ तयार :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes