काळा चणा सलाड /काळा चणा चाट (kala chana salad recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#kdr
हे काळा चणा सलाड /काळा चणा चाट मी नेहमी व्यायाम करून आल्यावर खाण्यासाठी करते यामुळे जास्त वेळ एनर्जी राहते लवकर भूकही लागत नाही तसेच काळा चणा वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहेच आणि हेल्दी ऑप्शन आहे.

काळा चणा सलाड /काळा चणा चाट (kala chana salad recipe in marathi)

#kdr
हे काळा चणा सलाड /काळा चणा चाट मी नेहमी व्यायाम करून आल्यावर खाण्यासाठी करते यामुळे जास्त वेळ एनर्जी राहते लवकर भूकही लागत नाही तसेच काळा चणा वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहेच आणि हेल्दी ऑप्शन आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. काळा चणा शिजवण्यासाठी
  2. 1/2 कपकाळा चणा
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 1/8 टीस्पूनहिंग
  5. चवीनुसारमीठ
  6. 1/2 कपपाणी
  7. काळा चणा सलाड/ चाट बनविण्यासाठी
  8. 1 टीस्पूनतेल
  9. 1/2 टीस्पूनजीरे
  10. 1/2 टीस्पूनउडीद डाळ
  11. 5-6कडीपत्ता पाने
  12. 1हिरवी मिरची बारीक चिरून
  13. 1 टीस्पूनधने पावडर
  14. 1/2 टीस्पूनतिखट
  15. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  16. चवीनुसारमीठ
  17. 2 टेबलस्पूनबेसन
  18. 1/2लिंबाचा रस
  19. 1 कपचिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी किसलेले गाजर
  20. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पाने,
  21. 1 टीस्पूनजीरे पावडर
  22. 1 टीस्पूनचाट मसाला
  23. 1/4 कपचिंचेची गोड चटणी
  24. 1/2 कपबारीक शेव

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    काळा चणा हळद हिंग मीठ पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या आणि यातील पाणी बाजूला काढून ठेवावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यात जीरे कढीपत्ता उडदाची डाळ मिरची घालून परतावे त्यावर शिजवून घेतलेले काळा चणा तिखट धने पावडर आमचूर पावडर घालून एकत्र मिक्स करावे.

  2. 2

    आता गॅस बारीक करुन त्यात बेसन पीठ काळा चणा शिजवण्यासाठी वापरलेलं पाणी लिंबू रस घालून एकत्र करावे आणि झाकण ठेवून 5-7 मिनिटे शिजवून गॅस बंद करावा.

  3. 3

    कांदा टोमॅटो काकडी कोथिंबीर पुदिन्याची पाने चिरून घ्यावी गाजर किसून घ्या आणि कढईमध्ये घाला वरून जीरे पावडर चाट मसाला लिंबू रस घालून एकत्र करावे. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून चिंचेची चटणी कोथिंबीर आणि शेव घालून काळा चना चाट/ चना सलाड सर्व्ह करावे.(शेव चिंचेची चटणी न घालता सर्व्ह केले तरी चालते.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Top Search in

Similar Recipes